कोल्हापूर : कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या जयंती निमित्त येथे मंगळवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ तसेच रंगबहार संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

चित्रपट महामंडळातर्फे कलामहर्षी पेंटर यांच्या शिल्पाचे पूजन सिने कॅमेरामन इम्तियाज बारगीर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांचे कलाकर्तृत्व उदंड मानावे लागेल, अशा भावना जाणकारांनी व्यक्त केल्या. महामंडळाचे माजी संचालक रणजीत जाधव, सतीश बिडकर, विजय शिंदे, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती, सुभाष गुंदेशा, अर्जुन नलवडे, वनिता दीक्षित, अनिल काशीकर, संजय पटवर्धन, सुनील मुसळे, विजय पोळ, हनमंत जोशी, अमर मठपती, बाबा लाड, दिलीप काटे, रवींद्र बोरगावकर, नम्रता गोडबोले, सिद्धेश मंगेशकर आदी कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाबहार संस्थेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पेंटर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. संस्थेचे सचिव संजीव संकपाळ, श्रीकांत डिग्रजकर, प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे, सुधीर पेटकर, सतीश बिडकर, बबन माने, राहुल रेपे, प्रा. अभिजित कांबळे, सुदर्शन वंडकर, विजय उपाध्ये, सुभाष वाणी, पुष्कराज मेस्त्री उपस्थित होते. याप्रसंगी कलामहर्षींच्या आठवणींचा जागर करण्यात आला.