कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीचा अध्यक्ष असला पाहिजे. या निवडणुका झाल्या की, भाजप लगेच कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार असलो तरी या निवडणुकांमध्ये भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल. त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी यावेळी निवडणुकीचा कार्यक्रमच मांडला.

कुर (ता. भुदरगड) येथे भाजपने कोल्हापूर विजय संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पश्चिम विभागाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले.

पाटील म्हणाले, विधानसभेला महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांची निवडणूक आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रूपाने होऊ घातली आहे. त्यांच्यासाठी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी काम करणे म्हणजे त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासारखेच आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी काम करू.

दादांचा निवडणूक कार्यक्रम

लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वांत महत्त्वाची ही निवडणूक असून कदाचित आज शनिवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल. त्यावर कुणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटतं. मी ४० वर्षे यामध्ये घालवली असल्याने अंदाज मांडला आहे. दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल. त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी यावेळी निवडणुकीचा कार्यक्रमच मांडला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीचा अध्यक्ष असला पाहिजे. या निवडणुका झाल्या की, भाजप लगेच कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार असलो तरी या निवडणुकांमध्ये भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. विधानसभेला महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांची निवडणूक आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रूपाने होऊ घातली आहे. त्यांच्यासाठी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी काम करणे म्हणजे त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासारखेच आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी काम करू असेही ते या वेळी म्हणाले.