scorecardresearch

Premium

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिराशेजारील वास्तू अधिग्रहण; शेतकरी संघाची जीत, जिल्हा प्रशासनाची हार

महालक्ष्मी मंदिराच्या शेजारील शेतकरी सहकारी संघाची वास्तू अधिग्रहित करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेला शनिवारी उच्च न्यायालयाने गैर ठरवले आहे.

mumbai high court, district collector of kolhapur, building of farmers cooperative union, mumbai high court slams district collector of kolhapur
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिराशेजारील वास्तू अधिग्रहण; शेतकरी संघाची जीत, जिल्हा प्रशासनाची हार (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिराच्या शेजारील शेतकरी सहकारी संघाची वास्तू अधिग्रहित करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेला शनिवारी उच्च न्यायालयाने गैर ठरवले आहे. अशा प्रकारे कोणतीही जागा अधिग्रहित करता येणार नाही असा निष्कर्ष नोंदवताना न्यायालयाने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना फटकारले आहे. आगामी नवरात्र उत्सवाची तयारी महालक्ष्मी मंदिर परिसरात सुरू झाली आहे. यावर्षी भाविकांची गर्दी वाढणार असल्याचा अंदाज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत शेतकरी संघाची भवानी मंडपातील भूमिगत मजला, तळमजला व पहिला मजला अशी इमारत अधिग्रहित करण्यात येणार असल्याची नोटीस बजावली होती. लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ सप्टेंबर रोजी ही इमारत ताब्यात घेतली. आता तेथे भाविकांसाठी दर्शन मंडप सुविधा उपलब्ध केली आहे.

हेही वाचा : आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्याचे एकत्रिकरण हाच पर्याय!

scheme to provide milk to tribal school students by Tribal Development Commissionerate of the State Government
आदिवासी विद्यार्थी चाखणार ‘वारणे’च्या टेट्रापॅकमधील आरोग्यवर्धक सुगंधी दूध
Shiva Vazarkar murder
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर याची धारदार चाकूने हत्या, चंद्रपूर शहरात तणावाचे वातावरण
Gyanvapi ASI report
‘ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी हिंदू मंदिर होते’, ASI अहवालाचा हवाला देत हिंदू पक्षकारांचा दावा
devotees in mandhardevi yatra
Mandhardevi Yatra 2024 : मांढरदेव यात्रेला सुरुवात; ‘काळूबाईच्या’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल

मात्र, या निर्णयाला शेतकरी संघाच्या अशासकीय प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने २४ ऑक्टोबर रोजी दसरा संपल्यानंतर २७ ऑक्टोबर पर्यंत वास्तू संघाच्या ताब्यात द्यावी, अशा प्रकारे कोणतीही जागा ताब्यात घेता येणार नसल्याचे न्यायालयाने निक्षून सांगितले आहे. तसेच जितका काळ ही इमारत वापरली आहे त्याचे भाडे द्यावे, असे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणी प्रशांत भालके, उत्कर्ष देसाई या वकीलांनी संघाची बाजू मांडली, अशी माहिती अध्यक्ष देसाई यांनी दिली.

हेही वाचा : ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या, अमोल मिटकरींनी मागितली माफी; नेमकं काय घडलं?

शेतकरी संघाचा जल्लोष

उच्च न्यायालयाने संघाच्या बाजूने निकाल दिला त्यावर आज संघाचे अध्यक्ष सुरेश देसाई, कार्यकारी संचालक सचिन सरनोबत यांच्यासह पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी फटाक्याची आतषबाजी केली. साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai high court slams district collector of kolhapur for occupying building of farmers cooperative union css

First published on: 07-10-2023 at 21:28 IST

आजचा ई-पेपर : कोल्हापूर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×