कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची २५ ऑगस्ट रोजी येथील ऐतिहासिक दसरा चौक येथे जाहीर सभा होणार आहे. यानिमित्त या गटाचे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरु झाली आहे. या गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर शहर व जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांची नियोजन बैठक पार पडली. व्ही.बी.पाटील यांनी या सभेच्या नियोजन संदर्भातपदाधिका-यांची मते जाणून घेऊन सूचना दिल्या. शुक्रवारी सभेपूर्वी तावडे हॉटेल ते ताराराणी चौकापर्यंत पवार यांच्या स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष.जयंत पाटील व माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>> कोल्हापुरात काँग्रेसचा दोन्ही लोकसभा जागांवर दावा, पण उमेदवारी कोणालाच नकोशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांची भेट राष्ट्रवादीतील फुटीच्या घटनेनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी जिल्ह्यातील तालुकावा सद्य परिस्थितीची माहिती दिली. शरद पवार यांनी जातीयवादी पक्षासोबत जाणेचा विचार करू नका.  जनतेमध्ये भाजपबाबत नकारात्मक वातावरण असल्याने आगामी निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच होणार असल्याचे सांगितले. शहराध्यक्ष आर.के.पोवार, प्रदेश प्रवक्ते राजीव आवळे, मदन कारंडे, नितीन जांभळे, अश्विनी माने, पदमा तिवले, युवक अध्यक्ष रोहित पाटील,आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.