आमदार रोहित पवार यांच्यावरील ईडी कारवाईचा विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी गुरुवारी आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात निदर्शने करण्यात आली तर इचलकरंजीत प्रांतकार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

चुकीच्या पद्धतीने चौकशी लावून विरोधकांना बदनाम केले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर झालेली ईडीची कारवाईही याच पद्धतीनें झाल्याचा आरोप करत कोल्हापुरात निदर्शने करण्यात आली. शहर अध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, सुनील देसाई, भारती पोवार आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

हेही वाचा >>>कोल्हापूरातील वादग्रस्त लक्षतीर्थ मदरसा जमीनदोस्त; मुस्लिम समाजाने स्वतःहून पाडलं बांधकाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 इचलकरंजी येथील मुख्यमार्गावरून प्रांतकार्यालयावर घंटानाद करत मोर्चा काढण्यात आला. राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला. प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची भेट घेऊन चुकीची कारवाई, बेरोजगारी, महागाई , नोकर भरतीतील भ्रष्टाचार थांबवावा, जातनिहाय जनगणना करावी यासह २६ मागण्यांचे निवदेन देण्यात आले. आंदोलनात मदन कांडे, नितीन जांभळे, उदयसिंह पाटील, नितीन कोकणे, अभिजीत रवंदे, मंगेश कांबुरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.