कोल्हापूर  :  मराठा समाज हा सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागास असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय आरक्षण मिळणे अवघड आहे. यामुळे सर्वप्रथम हा समाज मागास आहे हे सिद्ध करावे लागेल, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

संभाजीराजे म्हणाले, की मराठा समाजास न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळणे गरजेचे आहे. यापूर्वी दिलेली आरक्षणे ही न्यायालयात रद्द ठरली आहेत. यामागे मुख्य कारण हा समाज सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागास असल्याचे सिद्ध करण्यात सरकारला आलेल्या अडचणी आहेत. या अडचणी दूर करणे हे आरक्षण मिळण्यातील मुख्य काम आहे.

हेही वाचा >>> कायदा केल्यानंरतही महिलांना आरक्षणाचा लगेच लाभ नाही! कारण काय? जाणून घ्या…

दरम्यान सध्या राज्यात आरक्षणासाठी विविध जात समूहांच्या सुरू झालेल्या आंदोलनावर बोलताना ते म्हणाले, की सरकारने मराठा, धनगर, ओबीसी याच्या आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावेत. या वर्गाला केवळ झुलवत ठेवू नये. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण दिले जावे, असेही ते या वेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटना दुरुस्तीशिवाय अशक्य दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारच्या मनात काय आहे हे माहीत नाही. पण आरक्षण कसे देणार हे सर्वाना कळले पाहिजे. घटना दुरुस्तीशिवाय ते मिळू शकणार नाही हेही खरे आहे, असे मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले.