कोल्हापूर : ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ शिवराम बाबुराव भोजे ( वय ८२) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या संशोधन कार्याची नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. हृदयविकाराचा त्रासामुळे त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेऊन ते दोन दिवसापूर्वी घरी परतले होते. आज सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कसबा सांगाव (तालुका कागल) येथे त्यांचा जन्म झाला. गाव, कागल, कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. पुणे येथील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. प्रारंभी ते भाभा ऑटोमिक सेंटर येथे सेवेत रुजू झाले होते. नंतर अणुऊर्जेच्या प्रशिक्षणासाठी ते वर्षभर फ्रान्स येथे गेले होते.

त्यानंतर त्यांनी कल्पकम अणू केंद्रात दीर्घकाळ सेवा केली. शास्त्रज्ञ म्हणून रुजू झालेल्या भोजे यांनी कर्तुत्वावर संचालक पदापर्यंत झेप घेतली होती. कल्पकम येथे ४० मेगावॅट क्षमतेचा फास्ट ब्रीडर (द्रुत प्रजनन) प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर ५०० मेगाव्हेट क्षमतेची जबाबदारी ही त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यासाठी केंद्र सरकार , अणू आयोगाची मंजुरी आणण्याची जबाबदारी त्यांनी नेटकेपणाने पार पाडले होती. अणू आयोगाची पहिली बैठक कल्पकम येथे घेण्यात त्यांचा पुढाकार होता.

एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या भोजे यांनी आपल्या कर्तुत्वावर वैज्ञानिक क्षेत्रात मोठी झेप घेतली होती. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना डि.लीट उपाधीने सन्मानित केले होते. शिवाजी विद्यापीठाच्या अनेक समित्यांमध्ये त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण दादासाहेब मगदूम हायस्कूल, कसबा सांगगाव येथे पूर्ण केले. ते त्यांच्या शाळेत गणित आणि विज्ञान या विषयातील ज्ञानासाठी प्रसिद्ध होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे गेले. त्यांनी १९६५ मध्ये पुणे विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सीओईपी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी पूर्ण केली .

एप्रिल २००४ मध्ये वयाच्या ६२ व्या वर्षी ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे स्थायिक झाले. ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करत आहेत. ते ऑल इंडिया बोर्ड ऑफ पोस्ट-ग्रॅज्युएट एज्युकेशन अँड रिसर्च इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे ( एआयसीटीई ) सदस्य आहेत. त्यांच्या मूळ गावाभोवतीच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करणाऱ्या आम्ही सांगगावकर या सामाजिक संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत