Ind vs Eng : भारत विरूद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताने या मालिकेतील आपल्या विजयाचे खाते उघडले असून सध्या भारत २-१ ने पिछाडीवर आहे. इंग्लंडकडून बटलर-स्टोक्स जोडीने सामना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी १७९ धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. पण अखेर नव्या चेंडूवर भारताच्या जसप्रीत बुमराने ५ बळी टिपून इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला आणि भारताला इंग्लंडच्या भूमीत ४ वर्षांनी विजय मिळवून दिला. या व्यतिरिक्त, पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात १०३ धावा करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले. एकूण ५ खेळाडूंचे या सामन्यात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे भारताला आपला पहिला विजय नोंदवता आला.

१. विराट कोहली</strong> – भारताचा कर्णधार विराट कोहली हा कामगिरीतील सातात्यासाठी ओळखला जातो. पण भारताला गेल्या दोन सामन्यात हार पत्करावी लागल्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पहिल्या सामन्यात विराटने चांगली कामगिरी केली होती. पण दुसऱ्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यातच त्याला दुखापतीने ग्रासले असल्यामुळे त्याच्या सहभागाबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. पण अखेर विराटने सामन्यात पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली.

२. अजिंक्य रहाणे</strong> – गेल्या अनेक सामान्यांपासून चर्चेचा विषय ठरलेला अजिंक्य रहाणे याला या सामन्यात सूर गवसला. त्याने विराट कोहली बरोबर उत्तम भागीदारी करत पहिल्या डावात भारताला भक्कम स्थितीत पोहोचवले. उपकर्णधार म्हणून त्याची खेळी भारताला सुखावणारी ठरली. त्याने ८१ धावा करून भाफ्रंटच्या डावाला आकार दिला.

३. चेतेश्वर पुजारा – भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने अखेर आपल्यावरील टीकांना या सामन्यात उत्तर दिले. त्याने दुसऱ्या डावात भारतीवय डावाला सावरण्याचे काम केले. सामनावीर विराट कोहलीबरोबर त्याने मोठी भागीदारी केली. पुजाराने ७२ धावांची संयमी केल्ली करून भारताच्या डावाला दिशा दिली.

४. हार्दिक पांड्या – भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने या सामन्यात अत्यंत सुंदर गोलंदाजी केली. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहली याने सुरुवातीपासून हार्दिकवर विश्वास दाखवला होता. तो विश्वास सार्थ ठरवत त्याने पहिल्या डावात आघाडीच्या ५ फलंदाजांना बाद केले. तसेच भारताच्या दुसऱ्या डावात तडाखेबाज अर्धशतक केले.

५. जसप्रीत बुमरा – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याने दुसऱ्या डावात भेदक मारा केला. त्याने इंग्लंडचे ५ बळी तंबूत धाडले. बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी डावाला आकार दिला होता. पण नवीन चेंडू घेतल्यानंतर बुमराने इंग्लंडच्या डावाला सुरुंग लावला.