चेन्नई सुपरकिंग्समधून खेळत असलेला आणि मिस्टर आयपीएल म्हणून ख्याती असलेल्या सुरेश रैनाच्या नावावर आणखी एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सनराइजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने १५ चेंडूत १७ धावा केल्या. यात त्याने ३ चौकार मारले. त्याच्या या तीन चौकारांमुळे त्याच्या नावावर ५०० चौकार झाले आहेत. आयपीएल कारकिर्दीत ५०० चौकार मारण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याला स्थान मिळालं असून चौथ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत दिल्लीचा शिखर धवन आघाडीवर आहे. त्याने १८२ सामन्यात ६२४ चौकार मारले आहेत. सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १४८ सामन्यात ५२५ चौकार मारले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १९८ सामन्यात ५२१ चौकार ठोकले आहेत. तर या यादीत आता सुरेश रैनाचा समावेश झाला असून तो चौथ्या स्थानावर आहे. त्याने १९९ सामन्यात ५०२ चौकार मारले आहेत.

सुरेश रैनाने नुकतीच आयपीएलमध्ये २०० षटकार मारल्याची नोंद केली आहे. २०० षटकार मारण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे. तर भारताचा चौथा फलंदाज आहे. या यादीत ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहली आणि किरोन पोलार्ड आहेत.

डेविड वॉर्नर १० हजार धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये

सुरेश रैनाने आयपीएलच्या १९९ सामन्यात ५,४८९ धावा केल्या आहे. त्यात एक शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. या आयपीएल पर्वातही सुरेश रैनाची बॅट तळपत आहे. त्याने ६ सामन्यात एका अर्धशतकासह १२१ धावा केल्या आहेत. सुरेश रैनानं आयपीएल २०२० मध्ये खासगी कारणामुळे सहभाग घेतला नव्हता.