18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणेला वगळलं

'या' खेळाडूची सरप्राईज एंट्री

लोकसत्ता टीम | Updated: October 2, 2017 8:00 AM

चांगली कामगिरी करुनही अजिंक्य रहाणेला वगळलं

वन-डे सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय मिळवल्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने काल रात्री उशीरा भारतीय संघाची घोषणा केली. टी-२० मालिकेसाठी या संघात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. वन-डे मालिकेत सलग चार सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागेवर शिखर धवनने परत संघात स्थान मिळवलं आहे.

याव्यतिरीक्त मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनाही विश्रांती देण्यात आली असून आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिकने संघात पुनरागमन केलं आहे.

टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अक्षर पटेल.

First Published on October 2, 2017 8:00 am

Web Title: australia tour of india 2017 bcci announced squad against australia for t 20 series star batsman ajinkya rahane dropped