China Open 2018 : स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतने थायलंडच्या सुपन्यू अविहिंगसॅनन याला २१-१२, १५-२१, २४-२२ असे पराभूत केले. श्रीकांतसाठी ही लढत अतिशय महत्वाची ठरली. पहिल्या गेममध्ये भारताच्या श्रीकांतने २१-१५ असा विजय मिळवला. मात्र नंतरच्या गेममध्ये अविहिंगसॅनन याने पुनरागमन केले आणि त्याला १५-२१ अशी धूळ चारली. त्यामुळे तिसरा सेट हा अटीतटीचा होणार याची चाहत्यांना खात्री होती. त्यानुसार तो गेम रंगतदार झाला. अखेर श्रीकांतने २४-२२ अशा

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या श्रीकांतने डेन्मार्कच्या रासुमस जेमके याला २१-९,२१-१९ असे सलग दोन गेममध्ये पराभूत करून स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश मिळवले. पहिला गेम अत्यंत सहजपणे जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये अखेरच्या टप्प्यात दोन गुणांची आघाडी घेत श्रीकांतने विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान भारताच्या एच. एस. प्रणॉयला मात्र एकेरीत पराभव पत्करावा लागला. त्याला हॉँगकॉँगच्या का लॅँग अ‍ॅँगुस याने १६-२१,१२-२१ असे सलग दोन गेममध्ये पराभूत केल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.