आयपीएलमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार म्हणून हा त्याचा २००वा सामना आहे. चेन्नई संघाचे २००वेळा नेतृत्व करण्याचा मान त्याला मिळाला आहे.आजच्या दिवशी चेन्नईने २००८ मध्ये पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्या सामन्यात धोनीने सराव सत्राला हजेरी लावली नव्हती. संघातील खेळाडूंना तो थेट बसमध्ये भेटला होता. धोनीनं चेन्नईसाठी आतापर्यंत सर्व सामन्यात नेतृत्व केलं आहे.

आयपीएलमध्ये धोनीने १७७ सामन्यात तर चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या २४ सामन्यात सीएसकेचे नेतृत्व केले आहे. मात्र चॅम्पियन लीग टी २० च्या एका सामन्यात त्याने कर्णधारपद सुरेश रैनाकडे सोपवलं होतं. २०१६-१७ च्या हंगामात धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे ३० सामन्यात नेतृत्व केले होते.

‘‘तेव्हा मॅक्सवेल माझ्यावर खूप रागावला होता’’, डिव्हिलियर्सने केला खुलासा

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं तीन आयपीएल चषक आपल्या नावावर केले आहे. २०१०, २०११ आणि २०१८ साली धोनीच्या नेतृत्वात आयपीएल चषकावर आपलं नाव कोरलं आहे. धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत ४,६३२ धावा केल्या आहेत. त्यापैकी ४,०५८ धावा या चेन्नई संघासाठी केल्या आहेत. त्याने फलंदाजीची सरासरी ४०.६३ आणि स्ट्राईक रेट १३६.६७ इतका आहे.

IPL 2021 : मायदेशी परतलेल्या बेन स्टोक्सने गावसकरांना केले ट्रोल!

चॅम्पियन लीग टी २० च्या २४ सामन्यात त्याने ४४९ धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर २०१० आणि २०१४ चा चषक त्याने चेन्नईला जिंकून दिला आहे. तर त्याने आयपीएलमध्ये २१६ षटकार ठोकले आहेत. तर यष्टीच्या मागे १४८ गडी बाद केले आहेत.