News Flash

भारताच्या मदतीसाठी अजून एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची करोना लढ्यात उडी

IPL२०२१मध्ये 'हा' क्रिकेटपटू होता CSKचा सदस्य

चेन्नई सुपर किंग्ज

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघात असलेला जेसन बेहरेनडॉर्फने भारतात हाहाकार माजवलेल्या करोना विरूद्ध लढा देण्यासाठी युनिसेफला देणगी दिली आहे. बेहरेनडॉर्फने ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

या हंगामात बेहरेनडॉर्फ चेन्नईच्या संघात होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. जोश हेजलवूडच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. बायो बबलमध्ये थकवा जाणवत असल्याचे सांगून हेजलवूडने आयपीएलमधून माघार घेतली. या हंगामासाठी झालेल्या लिलावात बेहरेनडॉर्फवर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती.

करोनाने बायो बबलला भेदल्यानंतर बीसीसीआयने आता आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब केले आहे. आयपीएलमधील काही खेळाडूंचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काही मैदान कर्मचार्‍यांनाही करोनाची लागण झाली आहे.

जेसन बेहरेनडॉर्फची पोस्ट

बेहरेनडॉर्फ म्हणाला, ”इतर क्रिकेटपटूंप्रमाणे भारताचे माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. हा एक सुंदर देश आहे, लोक नेहमीच स्वागत करतात आणि भारतात क्रिकेट खेळणे हा खूप चांगला अनुभव आहे. मात्र, येथे जे घडत आहे ते खरोखर भयावह आणि त्रासदायक आहे. माझे विचार या विषाणूमुळे पीडित असलेल्यांपासून कधीही दूर नाहीत. तुम्ही काय सहन करत आहात, याची मी कल्पनाही करू शकत नाही. या संकटाच्या पार्श्वभूमीवर युनिसेफ प्रकल्पात मदत करण्यासाठी काहीतरी करावे अशी माझी इच्छा होती. ज्यांनी भारताचे आदरातिथ्य अनुभवले आहे, अशा सर्वांना मी प्रोत्साहित करतो. मला माहित आहे, की भारतीय लोकांच्या प्रेम आणि मैत्रीच्या समोर ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु मला खात्री आहे की या गोष्टीमुळे काही फरक पडेल.”

 

कमिन्स आणि लीची भारताला मदत

कोलकाता नाइट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला देणगी देण्याचा निर्णय बदलला. त्याऐवजी कमिन्स हा निधी युनिसेफ ऑस्ट्रेलियाला देणार आहे. या निधीद्वारे भारतातील करोनाग्रस्तांची मदत केली जाईल. कमिन्सच्या आवाहनानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीनेही भारतीयांसाठी मदतीचा हात पुढे केला. लीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 8:05 pm

Web Title: csk player jason behrendorff made a donation to help india adn 96
Next Stories
1 ‘‘बाबा, तुमची आठवण येतेय’’, वॉर्नरच्या मुलींचे ‘ते’ चित्र व्हायरल
2 IPL पुढं ढकललं..आता टी-२० वर्ल्डकपचं काय?
3 दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राला करोनाची लागण
Just Now!
X