आयपीएल २०२१ च्या १४ व्या पर्वातील दूसरा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात शनिवारी रंगणार आहे. मागच्या पर्वात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर कर्णधार धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ नव्या जोशात कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. तर दिल्ली कॅपिटल्सनंही चेन्नई सुपरकिंग्जला धोबीपछाड देण्यासाठी कंबर कसली आहे.

दोन यष्टीरक्षक कर्णधार असलेले महेंद्र सिंग धोनी आणि ऋषभ पंत यांच्या रणनितीकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून आहे. ऋषभ पंत पहिल्यांदाज कर्णधारपदाच्या भूमिकेत मैदानात उतरणार आहे. ऋषभ पंतकडे महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातंय. तर महेंद्रसिंग धोनी आदर्श असल्याचं ऋषभ पंतने वारंवार सांगितलं आहे. दूसरीकडे कर्णधारपद यशस्वीरित्या भूषवलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे अनुभवाची शिदोरी आहे. त्यामुळे कोण कुणावर भारी पडणार याची उत्सुकता लागली आहे.

मॅक्सवेलच्या उत्तुंग षटकारानंतर बंगळुरु-पंजाबमध्ये ट्विटरवर गंमतीदार टीवटीव

चेन्नई सुपरकिंग्जने मागच्या पर्वात आघाडीला सॅम कर्रन याला संधी दिली होती. ऋतुराज गायकवाड यालाही संधी देऊन बघितली होती. मात्र धोनीची ही रणनिती सपशेल फेल ठरली होती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला गेल्या सत्रात सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.  आता धोनी नव्या रणनितीसह मैदानात उतरणार आहे. फाफ डुप्लेसीसह अष्टपैलू मोइन अलीला आघाडीला पाठवण्याची शक्यता आहे. तर सुरेश रैना आणि अंबाती रायडू यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असणार आहे. तर महेंद्रसिंग धोनी पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले, तर सॅम कॅर्रन आणि रविंद्र जडेजा संघाला मजबूत धावसंख्या उभारण्यात मदत करतील. तर दीपक चाहर आणि शार्दुल ठाकुरवर गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.

राहुल द्रविडचं हे रुप कधी पाहिलेलं नाही; विराटचं ट्वीट चर्चेत

मागच्या पर्वातील अंतिम फेरीत दिल्लीला मुंबईकडून पराभवाची चव चाखावी लागली होती. त्यामुळे यंदाचा आयपीएल किताब आपल्या नावावर करण्यासाठी दिल्लीचा संघ उत्सुक आहे. दिल्लीकडून शिखर धवनसोबत पृथ्वी शॉ आघाडीला फलंदाजी करतील. यंदाच्या पर्वात दिल्लीच्या संघात स्टीव स्मिथला स्थान मिळाल्याने संघ मजबूत स्थितीत आहे. त्याचबरोबर उमेश यादव, रविचंद्रन अश्विन यांच्यावरही लक्ष असणार आहे.

दोन्ही संघातील संभाव्य ११ खेळाडू

चेन्नई सुपरकिंग्ज: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मोइन अली, फाफ डुप्लेसी, अंबाती रायडू, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, सॅम कर्रन, कृष्णप्पा गौतम, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, शिरमन हेटमायर, क्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, अमित मिश्रा, इशांत शर्मा</p>