भारताचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने तिच्या डान्सने सर्वत्र जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर बर्‍याचदा व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी धनश्रीने क्रिकेटपटू श्रेयस अय्यरसोबत डान्स करत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. आता तिने भारताच्या सलामीवीर फलंदाजासोबत डान्स करत पुन्हा एकदा चाहत्यांना चर्चा करण्यास भाग पाडले आहे.

नव्या व्हिडिओमध्ये धनश्री क्रिकेटर शिखर धवनसोबत भांगडा डान्स करताना दिसत आहेत. हे दोघे पंजाबी गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओला 40 हजाराहून अधिक चाहत्यांनी पसंत केले आहे. धनश्रीने या व्हिडिओला गब्बरच्या स्टाइलमध्ये भांगडा असे कॅप्शन दिले आहे.

 

व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या धनश्रीला आपल्या डान्सच्या माध्यमातून बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. ती कोरिओग्राफरही आहे. काही दिवसांपूर्वी गायक जस्सी गिलसह ‘ओये होये होये’ हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्याला यूट्यूबवर 21 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 33 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर यूट्यूबवर तिच्या चाहत्यांची संख्या 20 लाखाहून अधिक आहे. धनश्री अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसली आहे.