दिविज शरण आणि पुरव राजा जोडीने एक विजय आणि एका सामन्यात पुढे चाल मिळाल्यामुळे एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित शरण आणि राजा जोडीने चायनीज तैपेईच्या सिन-हान ली आणि सिअन-यिन जोडीवर ४-६, ६-३, १०-७ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. पहिल्या गेममध्येच सव्र्हिस गमावल्याने दिविज-पुरव जोडी ०-२ अशी पिछाडीवर होती. परंतु लगेचच आपला खेळ सुधारत या जोडीने पुनरामगन केले. नवव्या गेममध्ये त्यांची सव्र्हिस भेदण्यात प्रतिस्पर्धी जोडीने यश मिळवले आणि त्यांनी पहिला सेट गमावला.
दुसऱ्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये आणि नवव्या गेममध्ये प्रतिस्पध्र्याची सव्र्हिस भेदत त्यांनी दुसऱ्या सेटवर कब्जा केला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दिविज-पुरव जोडीने शानदार खेळ केला. या जोडीने टायब्रेकरमध्ये बाजी मारत तिसऱ्या सेटसह सामना जिंकला.
दुसऱ्या फेरीत या जोडीची लढत स्वित्र्झलडच्या मार्को चिऊडिनेल्ली आणि जपानच्या तात्सुमा इटो जोडीविरुद्ध होणार होती. मात्र इटोला झालेल्या दुखापतीमुळे या जोडीने माघार घेतली आणि दिविज-पुरव जोडीने उपांत्य फेरीत धडक मारली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 12:57 pm