इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान अंतिम फेरीत पाकिस्तानकडून भारताला पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातले वाद समोर आले होते. विराट कोहली आणि भारतीय संघातील काही खेळाडूंना कुंबळे यांची कार्यपद्धती पसंत नसल्यामुळे त्यांनी बीसीसीआयकडे कुंबळे यांना बदलण्याची मागणी केली होती. यानंतर रवी शास्त्री यांच्याकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्र देण्यात आली. या घटनेला किमान दीड – दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला. मात्र हा वाद आपण विसरत असल्याचे संकेत अनिल कुंबळेने दिले आहेत.

CricketNext या संकेतस्थळाच्या अॅपसाठी अनिल कुंबळे यांची ब्रँड अँबेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी कुंबळे यांनी आपली Dream XI भारतीय टीम निवडली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कुंबळे यांनी विराट कोहलीला आपल्या संघात स्थान दिलं आहे. मात्र सौरव गांगुली आणि रविचंद्रन आश्विन यांची कुंबळेच्या संघात निवड झालेली नाहीये.

क्रिकेटनेक्स्ट अॅपसाठी अनिल कुंबळेचा Dream XI भारतीय संघ पुढीलप्रमाणे –

अनिल कुंबळे (कर्णधार), राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, कपिल देव, एम. एम. धोनी, हरभजन सिंह, जवागल श्रीनाथ आणि झहीर खान