News Flash

हेल्डर पोस्टिगा अ‍ॅटलेटिकोचा महत्त्वाचा खेळाडू

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे जेतेपद पटकावणाऱ्या अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाने पोर्तुगीजच्या हेल्डर पोस्टिगाला महत्त्वाचा खेळाडू म्हणून घोषित केले आहे.

| July 30, 2015 12:44 pm

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे जेतेपद पटकावणाऱ्या अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाने पोर्तुगीजच्या हेल्डर पोस्टिगाला महत्त्वाचा खेळाडू म्हणून घोषित केले आहे. जेतेपद कायम राखण्यासाठी अ‍ॅटलेटिको संघ दिदिएर ड्रोग्बाला ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी उत्सुक होता. त्यासाठी दहा लाख डॉलर्स रक्कम देण्याची तयारी अ‍ॅटलेटिकोने दर्शवली होती. मात्र ड्रोग्बाने नकार दिल्यामुळे हा करार होऊ शकला नाही. पोस्टिगाने दोन विश्वचषकांमध्ये पोर्तुगीजचे प्रतिनिधित्त्व केले होते. पोर्तुगालतर्फे त्याने २७ गोल केले. २००४, २००८ आणि २०१२ मध्ये युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेतही तो खेळला होता. प्रसिद्ध प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या एफसी पोटरे संघाचेही पोस्टिगाने प्रतिनिधित्व केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:44 pm

Web Title: hedler is the important player for team
टॅग : Player
Next Stories
1 डेव्हिस चषकाची लढत दिल्लीत चेक प्रजासत्ताकविरुद्ध मुकाबला
2 बार्सिलोनाचा दारुण पराभव
3 टेनिस : साकेत मायनेनीला पराभवाचा धक्का
Just Now!
X