सलामीवीर मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या वन-डे सामन्यातही बाजी मारली आहे. भारताने विजयासाठी दिेलेलं २९७ धावांचं आव्हान न्यूझीलंडने ५ गडी राखत पूर्ण केलं. या विजयासह न्यूझीलंडने वन-डे मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला असून, टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
अवश्य वाचा – ICC ODI Ranking : विराट-रोहितचं स्थान कायम
अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ तरुण खेळाडूंना घेऊन मैदानात उतरला होता. मात्र या खेळाडूंना संधीचं सोनं करता आलेलं नाही. भारताकडून लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा हे खेळाडू या मालिकेत चमकले. जाडेजाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही आपली चमक दाखवत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात पुरेपूर प्रयत्न केले.
‘s Mohammad Nabi climbs to No.1 on the MRF Tyres ICC All-rounder rankings
Ben Stokes lost some ground after having been rested for the recent South Africa ODIs.
Full rankings https://t.co/sipiRIYBOW pic.twitter.com/MUC101Cx04
— ICC (@ICC) February 12, 2020
दरम्यान अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबीने या क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली असून, इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्या स्थानी घसरला आहे. दरम्यान, वन-डे मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
अवश्य वाचा – ICC ODI Ranking : जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान गमावलं