इंग्लंडच्या संघाने नुकतीच श्रीलंकेविरूद्ध २-०ने कसोटी मालिका जिंकली. श्रीलंकेच्या भूमीत त्यांच्याच फलंदाजांना धूळ चारण्यात इंग्लंडच्या फिरकीपटूंचा मोठा वाटा होता. शेवटच्या डावात तर श्रीलंकेचा संघ अवघ्या १२६ धावांत गारद झाला. महत्त्वाची बाब म्हणजे या डावात श्रीलंकेचे दहाच्या दहा फलंदाड इंग्लंडच्या फिरकीपटूंनी बाद केले. त्यामुळे भारताशी दोन हात करण्याआधी इंग्लंडच्या फिरकीपटूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. पण भारताविरूद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धने याने इंग्लंडच्या फिरकीपटूंना चेतावणी दिली आहे.

IND vs ENG: इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं ‘टीम इंडिया’बद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला…

“इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचने श्रीलंकेविरूद्धच्या २ सामन्यांच्या मालिकेत १ बळी टिपले. तर दुसरा फिरकीपटू डॉम बेस याने १२ बळी टिपले. त्यामुळे आता भारताविरूद्धची मालिका खूपच रंजक होणार यात वाद नाही. क्रिकेट हा अशाच रंजक गोष्टींबाबतचा खेळ आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन कसोटी मालिका जिंकाव्या लागतात. श्रीलंकेत इंग्लंडचे दोन फिरकीपटू खूप काही शिकले असतील, पण भारतात त्यांच्यापुढे मोठं आव्हान असेल”, असा इशारा जयवर्धने याने दिला.

Video: लाईव्ह पत्रकार परिषद सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्…

“श्रीलंकेविरूद्ध विश्रांती दिलेले बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे दोन खेळाडू भारत दौऱ्यासाठी संघात पुनरागमन करत आहेत. बेन स्टोक्समुळे इंग्लंडच्या संघाचा अनुभव वाढेल. तसंच वरच्या फळीत फलंदाजी करू शकणारा डावखुरा फलंदाज संघात येईल. भारतातील संथ खेळपट्ट्यांवर वेगवान मारा करणारा जोफ्रा आर्चर कसा खेळतो हे पाहणं खूपच रंजक असेल”, असंही जयवर्धने म्हणाला.