न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात हार्दिक पांड्याने 22 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी करत भारताला 250 धावांचा महत्वाचा टप्पा ओलांडून दिला. आपल्या या छोटेखानी खेळीत हार्दिकने तब्बल 5 उत्तुंग षटकारही मारले. या कामगिरीसह हार्दिक पांड्याने न्यूझीलंडविरुद्ध एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरशी बरोबरी केली. याचसोबत हार्दिकने आजच्या खेळीदरम्यान आणखी एक योगायोग जुळवून आणला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पांड्याने सलग चौथ्यांदा 3 सलग चेंडूवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू टॉड अॅस्टलच्या 46 व्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर पांड्याने षटकार ठोकले. याआधीही हार्दिकने अशी कामगिरी केली आहे.

हार्दिक पांड्याने अखेरच्या क्षणात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 252 धावांचा टप्पा गाठला. बंदीची शिक्षा भोगून आलेल्या पांड्याने पुनरागमनानंतर आपलं महत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

अवश्य वाचा – IND vs NZ : छोटेखानी खेळीत हार्दिकचा मोठा विक्रम, सचिनच्या विक्रमाशी बरोबरी