News Flash

Video : धोनीचा कृणालला सल्ला अन् भारताला मिळाला पहिला बळी

धोनीच्या 'त्या' कानमंत्रापुढे मुनरोची फलदांजीही पडली फिकी

भारतीय संघ पहिल्या टी २० सामन्यात न्यूझीलंडकडून ८० धावांनी पराभूत झाला. यजमानांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. २२० धावांचे आव्हान पार करताना भारताचा संघ केवळ १३९ धावाच करू शकला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय फसला, पण धोनीने या सामन्यातही मैदानावर यष्टिरक्षण करताना आपले अस्तित्व दाखवून दिले.

सलामीवीर कॉलिन मुनरो आणि टीम सिफर्ट यांनी न्यूझीलंडसाठी धडाकेबाज सुरुवात केली. त्यांनी ८६ धावांची सलामी दिली. दोनही सलामीवीर दमदार फलंदाजी करत होते. प्रत्येक गोलंदाजाला त्यांनी झोडपून काढले. त्यानंतर अखेर धोनीने कृणाल पांड्याला एक सल्ला दिला आणि सलामीवीर कॉलिन मुनरो झेलबाद झाला. मुनरोने २० चेंडूत २ चौकार आणि २ षटकार लगावत ३४ धावा ठोकल्या. पण धोनीच्या कानमंत्रापुढे मुनरोची फलदांजीही फिकी पडली.

दरम्यान, ही भागीदारी तुटल्यानंतरही सिफर्टने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. या खेळीदरम्यान त्याने आपले अर्धशतक साजरे केले. कर्णधार विल्यमसनच्या साथीने सिफर्टने ४३ चेंडूत ८४ धावा पटकावल्या. खलिल अहमदने सिफर्टचा अडसर दूर केल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी धावसंख्येत आपापल्यापरीने भर घातली. अखेर २० षटकात न्यूझीलंडने ६ गड्यांच्या मोबदल्यात २१९ धावांपर्यंत मजल मारली. हार्दिक पांड्याने २ फलंदाजांना माघारी धाडले. तर भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, युजवेंद्र चहल आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी १ बळी घेतला.

२२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या या सारख्या फलंदाजांनी पूर्णपणे गुडघे टेकले. शिखर धवन, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न बरेच तोकडे पडले. अखेरीस 80 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक ३ बळी टिपले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2019 6:01 pm

Web Title: ind vs nz video team india wicket keeper ms dhoni guided krunal pandya to take colin munro wicket
Next Stories
1 अबब ! संघाच्या धावसंख्येपेक्षा अवांतर धावाच अधिक
2 IND vs NZ : अरेरे… भारताचा झाला सर्वात मानहानीकारक पराभव
3 थरारक झेल घेऊनही नेटकऱ्यांनी केलं कार्तिकला ट्रोल
Just Now!
X