29 November 2020

News Flash

Ind vs WI : अब तक छप्पन ! ‘युनिव्हर्सल बॉस’ ठरला ‘हिटमॅन’पेक्षा सरस

ख्रिस गेलच्या अखेरच्या वन-डेत ७२ धावा

भारताविरुद्धच्या अखेरच्या वन-डे सामन्यात विंडीजचा सलामीवीर ख्रिस गेलला अखेरीस सूर सापडला आहे. ख्रिसने ४१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ७२ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत ख्रिस गेलने शाहिद आफ्रिदी, रोहित शर्मा यांना मागे टाकलं आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गेल दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज –

  • एबी डिव्हीलियर्स – ५८ षटकार (२०१५)
  • ख्रिस गेल – ५६ षटकार (२०१९*)
  • शाहिद आफ्रिदी – ४८ षटकार (२००२)
  • रोहित शर्मा – ४६ षटकार (२०१७)

पावसाने व्यत्यय आणल्यानंतर सामना ३५ षटकांचा करण्यात आला. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या सत्रात चांगलं पुनरागमन करत विंडीजला २४० धावांमध्ये रोखलं.

अवश्य वाचा – Ind vs WI : सचिनला मागे टाकत गेलने रचला इतिहास, तिसऱ्या वन-डेत आक्रमक खेळी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2019 1:43 am

Web Title: ind vs wi chris gayle broke record of rohit sharma and shahid afridi in last odi psd 91
Next Stories
1 Ind vs WI : सचिनला मागे टाकत गेलने रचला इतिहास, तिसऱ्या वन-डेत आक्रमक खेळी
2 Ind vs WI : अखेरच्या वन-डेत विंडीज सलामीवीरांची फटकेबाजी, १७ वर्षांनी रचला विक्रम
3 Raksha Bandhan 2019 : विंडीज दौऱ्याआधी अजिंक्यने पार पडली भावाची जबाबदारी
Just Now!
X