News Flash

धोनी संघाचा केंद्रबिंदू, भारताला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी – मोहम्मद कैफ

धोनी सध्या चांगल्या फॉर्मात

2019 चा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना, भारतीय संघाच्या निवडीबद्दल अजुनही शक्यता वर्तवल्या जात आहेत. पर्यायी सलामीवीर, मधल्या फळीतल्या फलंदाजांचे क्रम, पर्यायी गोलंदाज अशा जागांवर निवड समितीची शोध मोहीम सुरु आहे. मध्यंतरीच्या काळात महेंद्रसिंह धोनीच्या ढासळलेल्या फॉर्ममुळे भारताची मधल्या फळीतली फलंदाजी तकलादू वाटत होती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत धोनीने पुनरागमन केलं. भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफनेही विश्वचषकासाठी धोनीला पाठींबा दिला असून, धोनी हाच भारतीय संघाचा केंद्रबिंदू असल्याचं कैफने म्हटलं आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी लोकेश राहुलचं फॉर्मात येणं गरजेचं – एम.एस.के. प्रसाद

“धोनी संघातला महत्वाचा खेळाडू आहे. तो सध्या संघाचा कर्णधार नाहीये, पण कर्णधार विराट कोहली आजही कठीण प्रसंगांमध्ये त्याची मदत घेतो. धोनी एकाप्रकारे संघाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक घटना ही त्याच्याभोवती घडत असते. प्रत्येक नवीन गोलंदाज धोनीची मदत घेतो, कर्णधारही धोनीच्या सल्ल्याला महत्व देतो. याचसोबत ज्या पद्धतीने धोनीने ऑस्ट्रेलियात फलंदाजी केली ती आशादायी आहे. कोहली, धोनी आणि इतर खेळाडूंच्या जोरावर यंदा भारताला विश्वचषक जिंकण्याची नामी संधी आहे.” हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कैफ बोलत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 12:23 pm

Web Title: indian team revolves around this player according to mohammad kaif
टॅग : Ms Dhoni,Virat Kohli
Next Stories
1 Video : बाद झाल्याच्या रागात फिंचने खुर्चीला झोडपले…
2 विराटला बाद करण्याचं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर मोठं आव्हान – मॅथ्यू हेडन
3 विश्वचषकासाठी लोकेश राहुलचं फॉर्मात येणं गरजेचं – एम.एस.के. प्रसाद
Just Now!
X