भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) सर्वाधिक मिळकत देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत सकाळच्या सत्रात इंग्लंडच्या बेन स्टोक्स या अष्टपैलू खेळाडूने बाजी मारली. बेन स्टोक्सला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी सर्वच संघ मालकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. स्टोक्सवर तब्बल १४.५० कोटींची बोली लावून पुण्याच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. सकाळी साडेनऊ वाजता लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली. मार्टिन गप्तीलच्या लिलावाने कार्यक्रमाला सुरूवात झाली, पण गप्तीलवर कोणत्याही संघाने बोली लावलीच नाही. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून वीरेंद्र सेहवागने इंग्लंडच्या इऑन मॉर्गनला दोन कोटींच्या बोलीसह संघात दाखल करून घेतले. भारताच्या इशांत शर्मावर २ कोटींची पायाभूत किंमत ठेवण्यात आली असतानाही त्यात एकाही संघाने रस दाखवला नाही. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टवर २ कोटींची बोली लावून कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला ताफ्यात दाखल करून घेतले.

वाचा: आयपीएल लिलावात विकले गेलेले आणि न विकले गेलेले खेळाडू कोणते?

भारतीय संघाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत अतिशय हुशारीने गोलंदाजी केलेला इंग्लंडचा टायमल मिल्स याच्यावरही चांगली बोली लागली. टायमल मिल्सला १२ कोटींंच्या बोलीसह बंगळुरूने आपल्या ताफ्यात दाखल केले. दुसरीकडे २ कोटींची पायाभूत किंमत ठेवण्यात आलेला भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यावेळी ‘अनसोल्ड’ राहिला. याशिवाय, चेतेश्वर पुजारा, मनोज तिवारी, आर.पी.सिंग या खेळाडूंना यावेळी कोणीच भाव दिला नाही. लिलावाच्या सकाळच्या सत्रात आतापर्यंत भारतीय खेळाडूंमध्ये कर्ण शर्मा याच्यावर सर्वाधिक ३ कोटी २० लाखांची बोली लागली आहे. तर अनिकेत चौधरीला २ कोटींचा भाव मिळाला आहे. मागील पर्वात तब्बल साडेआठ कोटींची बोली लागलेला पवन नेगी याच्यावर यावेळी केवळ १ कोटींची बोली लागली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नेगीला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. हे.

दहा वर्षांच्या पहिल्या टप्प्यातील हा अखेरचा लिलाव आहे. पुढील वर्षी सर्व खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील. एक संघ जवळपास २७ खेळाडूंना चमूत दाखल करून घेऊ शकतो. मात्र बहुतेक संघमालकांनी २२ ते २४ खेळाडूंचा चमू बनवण्यातच धन्यता मानली. १० लाख ते २ कोटींपर्यंत पायाभूत किंमत असलेले खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होते.

वाचा: कोण आहे कोट्याधीश टायमल मिल्स?

आयपीएल लिलावाच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा हरहुन्नरी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने येत्या आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  संघाशी करार संपुष्टात आणला आहे. ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मिचेल स्टार्क यांनी सहमतीने आगामी आयपीएल हंगामाच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. आयपीएल खेळाडूंच्या नियमावलीतील नियम क्रमांक ४१ अनुसार हा करार संपुष्टात आला आहे,’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली.

 

Live Updates
15:25 (IST) 20 Feb 2017
सयान घोष १० लाखांच्या बोलीसह केकेआरच्या ताफ्यात
15:24 (IST) 20 Feb 2017
मनोज तिवारीवर अखेर ५० लाखांची बोली लागली, पुण्याच्या संघात तिवारी दाखल
15:23 (IST) 20 Feb 2017
डारेन ब्राव्हो ५० लाखांमध्ये केकेआरच्या ताफ्यात
15:01 (IST) 20 Feb 2017
लिलाव प्रक्रियेत १५ मिनिटांचा ब्रेक
14:59 (IST) 20 Feb 2017
प्रथम सिंग १० लाखांच्या बोलीसह गुजरातच्या संघात
14:56 (IST) 20 Feb 2017
इशांत जागी देखील १० लाखांच्या बोलीसह केकेआरच्या ताफ्यात
14:55 (IST) 20 Feb 2017
संजय यादववर कोलकाता नाईट रायडर्सकडून १० लाखांची बोली
14:53 (IST) 20 Feb 2017
शुभम अग्रवालवर १० लाखांची बोली, गुजरातच्या संघात दाखल
14:51 (IST) 20 Feb 2017
बांगलादेशचा मेहमदुल्ला देखील अनसोल्ड
14:50 (IST) 20 Feb 2017
मेहदी हसन देखील अनसोल्ड
14:50 (IST) 20 Feb 2017
चिराग सुरी १० लाखांच्या बोलीसह गुजरात लायन्सच्या ताफ्यात दाखल
14:48 (IST) 20 Feb 2017
तेजेंद्र सिंगवर १० लाखांची पायाभूत बोली, पण एकही संघ इच्छुक नाही
14:47 (IST) 20 Feb 2017
बेन व्हिलर देखील अनसोल्ड
14:47 (IST) 20 Feb 2017
डी पीटोरियसवर ३० लाखांची पायाभूत किंमत, पण पीटोरियस देखील अनसोल्ड
14:45 (IST) 20 Feb 2017
के.खेजोरोलिया १० लाखांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल
14:43 (IST) 20 Feb 2017
रिंकू सिंग १० लाखांच्या बोलीसह किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात दाखल
14:41 (IST) 20 Feb 2017
मुनाफ पटेल ३० लाखांच्या बोलीसह गुजरातच्या संघात दाखल
14:40 (IST) 20 Feb 2017
न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरवर देखील बोलीस कोणताही संघ इच्छुक नाही, अनसोल्ड
14:39 (IST) 20 Feb 2017
डॅरेन सॅमीवर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ३० लाखांची बोली
14:38 (IST) 20 Feb 2017
वेस्ट इंडिजच्या रोवमन पॉवेलवर कोलकाताकडून ३० लाखांची बोली
14:37 (IST) 20 Feb 2017
द.आफ्रिकेचा अष्टपैलू वेन पारनेलची पायाभूत किंमत ५० लाख, पण अनसोल्ड
14:37 (IST) 20 Feb 2017
जेम्स निशाम देखील अनसोल्ड
14:35 (IST) 20 Feb 2017
श्रीलंकेचा ए.गुरूनाथन ३० लाखांच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल
14:33 (IST) 20 Feb 2017
सौरभ कुमार १० लाखांच्या बोलीसह पुण्याच्या संघात
14:33 (IST) 20 Feb 2017
राहुल चहार १० लाखांच्या बोलीसह पुण्याच्या संघात
14:32 (IST) 20 Feb 2017
मोहम्मद सिराजवर २ कोटी ६० कोटींची बोली, सन रायझर्स हैदराबादच्या खात्यात
14:29 (IST) 20 Feb 2017
सयान घोष अनसोल्ड
14:29 (IST) 20 Feb 2017
सयान घोषवर १० लाखांची पायाभूत किंमत, पण बोली लागली नाही
14:28 (IST) 20 Feb 2017
दिशांत यागनिकला देखील भाव मिळाला नाही
14:26 (IST) 20 Feb 2017
अपूर्व वानखेडे अनसोल्ड
14:25 (IST) 20 Feb 2017
हिमांशू राणा देखील अनसोल्ड
14:23 (IST) 20 Feb 2017
डेव्हिड विसा अनसोल्ड
14:22 (IST) 20 Feb 2017
श्रीलंकेचा थिसारा परेरा देखील अनसोल्ड
14:21 (IST) 20 Feb 2017
मनोज तिवारी पुन्हा एकदा अनसोल्ड
14:20 (IST) 20 Feb 2017
डारेन ब्राव्होवर पायाभूत किंमत ५० लाख, पण कोणताही संघ मालक इच्छुक नाही
14:18 (IST) 20 Feb 2017
नवदीप सानीवर दिल्लीकडून १० लाखांची बोली
14:15 (IST) 20 Feb 2017
दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहीर देखील अनसोल्ड
14:14 (IST) 20 Feb 2017
न्यूझीलंडचा इश सोधी देखील अनसोल्ड
14:13 (IST) 20 Feb 2017
प्रग्यान ओझा देखील अनसोल्ड
14:13 (IST) 20 Feb 2017
इशांत शर्मा पुन्हा एकदा अनसोल्ड
14:12 (IST) 20 Feb 2017
इशांत शर्मा पुन्हा एकदा लिलावासाठी, पायाभूत किंमत २ कोटी
14:11 (IST) 20 Feb 2017
नेथन कोल्टर नाईलवर कोलकाताकडून साडेतीन कोटींची बोली
14:10 (IST) 20 Feb 2017
ऑस्ट्रेलियाच्या नेथन कुल्टर नाईलवर बोलीला सुरूवात
14:09 (IST) 20 Feb 2017
जॉनी बेअरस्टो देखील पुन्हा एकदा 'अनसोल्ड'
14:08 (IST) 20 Feb 2017
इरफान पठाण पुन्हा एकदा अनसोल्ड
14:07 (IST) 20 Feb 2017
इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनवर सन रायझर्स हैदराबादकडून ५० लाखांची बोली
14:06 (IST) 20 Feb 2017
शॉन अॅबॉट पुन्हा एकदा अनसोल्ड
14:06 (IST) 20 Feb 2017
सौरभ तिवारी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, ३० लाखांची बोली
14:04 (IST) 20 Feb 2017
इंग्लंडच्या जेसन रॉयवर गुजरात लायन्सकडून १ कोटींची बोली
14:03 (IST) 20 Feb 2017
मार्टिन गप्तील किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात दाखल