31 May 2020

News Flash

IPL 2019 : मूर्ती लहान, किर्ती महान ! विराट-डिव्हीलियर्सला न जमलेली कामगिरी पार्थिव पटेलच्या नावावर

पार्थिव पटेलच्या आक्रमक ४३ धावा

आयपीएलच्या बाराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची कामगिरी चांगली झालेली नाही. गुणतालिकेत सध्या तळाशी असलेला संघ, प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर फेकला गेला आहे. बुधवारी घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात बंगळुरुचा सलामीवीर पार्थिव पटेलने अनोखी कामगिरी केली आहे.

मोहम्मद शमी टाकत असलेल्या सहाव्या षटकात पार्थिव पटेलने १८ धावा वसूल केल्या. आयपीएलच्या बाराव्या हंगामात एका षटकात १८ धावा काढण्याची पार्थिव पटेलची ही दुसरी वेळ ठरली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बंगळुरुचे प्रमुख फलंदाज विराट कोहली-एबी डिव्हीलियर्स यांनाही अशी कामगिरी करता आलेली नाहीये.

दरम्यान पंजाबविरुद्धच्या सामन्यात चांगली सुरुवात होऊनही बंगळुरुचा डाव कोलमडला. पार्थिव पटेलने २४ चेंडूत ४३ धावा केल्या. या खेळीदरम्यान पार्थिवने ७ चौकार आणि २ षटकार लगावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2019 9:15 pm

Web Title: ipl 2019 parthiv patel claims unique record against kxip
टॅग IPL 2019,Rcb
Next Stories
1 IPL 2019 RCB vs KXIP : बंगळुरूची विजयी हॅटट्रिक; पंजाबवर १७ धावांनी विजय
2 महिला क्रिकेटपटूही खेळणार IPL, जाणून घ्या वेळापत्रक
3 विश्वचषकासाठी भारताचा संघ संतुलित – राहुल द्रविड
Just Now!
X