आयपीएलच्या बाराव्या हंगामात, चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र 30 मे पासून सुरु होणाऱ्या वन-डे विश्वचषकासाठी भारतीय खेळाडूंनी गरज पडल्यास विश्रांती घ्यावी असा सल्ला विराट कोहलीने याआधीच दिला होता. गरज पडल्यास आपणही आयपीएलचे सामने खेळणार नाही, असं विराट कोहलीने म्हटलं आहे. तो India Today वाहिनीशी बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2019 : भुवनेश्वर कुमारचं प्रमोशन ! संघाच्या उप-कर्णधारपदाची धुरा

आगामी विश्वचषक लक्षात घेता तू आयपीएलमधून विश्रांती घेशील का असा प्रश्न विचारला असताना विराट म्हणाला, “हो, का नाही?? मी विश्रांती घेण्याची दाट शक्यता आहे. ही प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे. आयपीएलमध्ये खेळत असताना तुम्हाला कुठेही दुखापत झाली तर तात्काळ फिजीओला कळवा हे मी सांगितलं आहे. जर फिजीओने न खेळण्याचा सल्ला दिला तर खेळाडूंनी विश्रांती घेणं गरजेचं आहे.”

अवश्य वाचा – विराटच्या मदतीसाठी धावला फ्लेमिंग, गौतम गंभीरच्या टिकेला दिलं प्रत्युत्तर

“कोणत्याही सामन्यात खेळत असताना मला संघासाठी 100 टक्के कामगिरी करायला आवडतं. जर मी स्वतः माझ्या खेळाविषयी आणि तंदुरुस्तीविषयी आश्वस्त नसेन तर मी न खेळणं पसंत करेन.” विराट अतिक्रिकेटने येणाऱ्या ताणाबद्दल बोलत होता. त्यामुळे पहिल्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : मुंबई इंडियन्सला धक्का, लसिथ मलिंगा पहिल्या 6 सामन्यांना मुकणार