वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं कसोटी सामन्यात ३०० विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. असा पराक्रम करणारा इशांत तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरोधात चेन्नई येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना इशांत शर्मानं लॉरेन्सला बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इशांतच्या नावावर ९७ कसोटी सामन्यात २९७ बळींची नोंद होती. चेन्नई कसोटी सामन्यातील पिहल्या डावात इशांत शर्मानं दोन बळी घेतले. तर दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला विकेट मिळवत ३०० बळींचा पल्ला पार केला आहे.

इशांत शर्मानं ९८ व्या कसोटी सामन्यात ३०० बळी घेतेले आहेत. इशांत शर्माआधी कपिल देव आणि झहीर खान या दिग्गजांनी कसोटी सामन्यात ३०० बळी घेतले आहेत. ३०० पेक्षा जास्त विकेट घेणारा इशांत शर्मा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

आणखी वाचा- ११४ वर्षानंतर पहिल्यांदाच… अश्वीनने पहिल्याच चेंडूवर मोडला अनेक दशकांपूर्वीचा विक्रम

३०० बळी घेणारे भारतीय गोलंदाज –
कपिल देव (४३४)
जहीर खान (३११)
अनिल कुंबले (६१९)
हरभजन सिंह (४१७)
रविचंद्रन अश्विन (३६५)

इशांत शर्माच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे. दिग्गाजांनी इशांतचं अभिनंदनही केलं आहे. वसिम जाफरनं आपल्या खास शैलीत ट्विट करत इशांतच्या ३०० विकेटचं सेलिब्रेशन केलं आहे. जाफरनं ३०० या हॉलिवूडपटाचं पोस्टर पोस्ट करत इशांतचं अभिनंदन केलं आहे. आयसीसी आणि बीसीसीआय यांनीही ट्विट करत इशांत शर्माचं अभिनंदन केलं आहे.