पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर अडचणीत आलेला भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या आयपीएल सहभागावर अजुनही प्रश्नचिन्ह कायम आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख नीरज कुमार सध्या मोहम्मद शमीची फिक्सींगच्या आरोपांप्रकरणी चौकशी करत आहेत. त्यामुळे नीरज कुमार यांच्या अहवालानंतरच शमीच्या आयपीएल सहभागावर निर्णय घेतला जाईल असं, बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी स्पष्ट केलं. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट प्रशासकीय समिती शमीबद्दल निर्णय घेणार आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने शमीवर फिक्सींगचे आरोप केले होते.
अवश्य वाचा – हो मी पाकिस्तानी तरुणीला भेटलो होतो – मोहम्मद शमी
आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी दिल्ली डेअरडेविल्स या संघाने शमीला ३ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे. हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार राखून ठेवला होता. मोहम्मद शमीचे इतर मुलींसोबत अनैतिक संबंध असून शमी व त्याच्या परिवाराकडून आपला छळ होत असल्याची तक्रार हसीन जहाँने कोलकाता पोलिसांकडे केली होती. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची आज बैठक पार पडली, त्या बैठकीत शमीच्या सहभागाबद्दल चर्चा झाल्याचं समजतंय.
अवश्य वाचा – ‘हसीन जहाँने विवाहित असल्याचं लपवलं, आपल्या मुली बहिणीच्या असल्याची खोटी माहिती दिली’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 3:06 pm