करोना विषाणूचा फटका क्रीडा विश्वाला बसला आहे. जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू घरात बसून आपापल्या कुटुंबाला वेळ देत आहेत. याशिवाय काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. नुकतेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ याने ट्विटरवर एक प्रश्न उत्तरांचं सत्र घेतले. त्यात त्याला ‘विराट कोहलीचं वर्णन थोडक्यात कसं करशील?’, असा प्रश्न त्याला एका चाहत्याने विचारला. त्यावर मोहम्मद युसुफने अजिबात वेळ न दवडता ‘विराट म्हणजे सध्याच्या घडीचा अव्वल नंबरचा क्रिकेटपटू आणि एक महान खेळाडू’, असे उत्तर दिले. त्यानंतर एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीतही त्याने याचाच पुनरूच्चार केला.

ICC च्या ट्विटवर सचिन, गांगुलीचा अफलातून रिप्लाय

“आधुनिक क्रिकेटमध्ये अनेक चांगले क्रिकेटपटू आहेत. रोहित शर्मा, जो रूट, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन पण विराट कोहली हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. त्याची फलंदाजी करण्याची पद्धत, पहिल्या आणि दुसऱ्या डावात दडपण हाताळायची पद्धत आणि खेळता-खेळता सहज शतक करण्याची किमया यामुळे तो खरंच अनन्यसाधारण क्रिकेटपटू वाटतो”, असे युसूफ म्हणाला.

भारत कसोटी क्रिकेटचा तारणहार – ग्रेग चॅपल

विराट कोहलीची अनेकदा पाकिस्तानचा बाबर आझम याच्याशी तुलना केली जाते. त्याच्याबाबत बोलताना युसूफ म्हणाला, “बाबर हा युवा खेळाडू आहे. त्याची खूप जण विराटशी तुलना करतात. पण सध्या तरी अशी तुलना करणं योग्य नाही. कोहलीने बाबरपेक्षा खूप जास्त सामने खेळले आहेत. कोहलीचा अनुभव दांडगा आहे.”

विराट सर्वोत्तम वाटणाऱ्यांनी ‘या’ खेळाडूची फलंदाजी बघा – टॉम मूडी

एका कार्यक्रमात टॉम मूडी यांनी बाबर आझमच्या चांगल्या कामगिरीचा उल्लेख केला. “गेल्या वर्षभरात बाबर आझमने अशी दमदार कामगिरी केली आहे की त्यातून तो नक्कीच खास स्थानावर पोहोचू शकेल. आपण नेहमी फलंदाजीत विराट कोहली कशाप्रकारे सर्वोत्तम आहे याची चर्चा करतो. जर तुम्हाला विराट कोहलीची फलंदाजी पाहायला आवडते, तर तुम्ही बाबर आझमची फलंदाजी नक्की पाहा. बाबर आझमने जरी केवळ २६ सामनेच खेळले असतील, तरी त्यापैकी अर्ध्या सामन्यांमध्ये तो मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसला. त्याला पाकिस्तानच्या संघाने मुख्य फलंदाजांपैकी एक मानलं नव्हतं. तो खरंच प्रतिभावंत फलंदाज आहे. पुढच्या पाच ते दहा वर्षात बाबर आझम नक्कीच दशकातील पहिल्या पाच सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत असेल”, असं मूडी यांनी स्पष्टपणे सांगितलं.