24 October 2020

News Flash

सचिन तेंडुलकर माझा आयडॉल-युवराज

सचिन तेंडुलकरकडून मी खूप काही शिकलो असेही युवराजने म्हटले आहे

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा माझा आयडॉल आहे असं सिक्सर किंग युवराज सिंगने म्हटलं आहे. मी सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंकडून खूप काही शिकलो आहे. क्रिकेटच्या बाबतीत मी  सचिनला मी माझा आयडॉल मानतो कारण त्याच्यासारख्या खेळाडूकडून मला खूप काही शिकायला मिळालं आहे असंही युवराजने म्हटलं आहे. आज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यावेळी त्याने आपले मनोगत व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत युवराज म्हणाला,  मी सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली खेळाला सुरूवात केली. त्यानंतर मी सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे या दोघांनाही मी खूप मानतो ते माझे आयडॉल आहेत. एम. एस. धोनीचेही मी आभार मानतो असंही युवीने म्हटलं आहे. आयपीएलच्या निवृत्तीबाबत आपण सचिन तेंडुलकरशी चर्चा केली आहे असंही युवीने स्पष्ट केलं.

सचिनसोबत मला खेळताना खरोखरच आनंद मिळाला असंही युवराजने म्हटलं आहे. इतकंच नाही तर सचिनसोबत विरेंद्र सेहवाग, झहीर खान, आशिष नेहरा हे क्रिकेटविश्वातले आपले खूप चांगले सोबती होते असंही युवराजने म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय कठीण होता. मात्र घरातल्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला असल्याचेही त्याने म्हटले आहे.

झंझावती क्रिकेटपटू अशी युवराजची ओळख आहे, कारण एकदा युवराज मैदानावर उतरला की तो षटकार आणि चौकार यांचा वर्षाव करत असे. आक्रमक खेळ करणाऱ्या या  खेळाडूला कॅन्सरनेही ग्रासलं होतं. मात्र क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूने कॅन्सरशीही यशस्वी लढा देऊन यशस्वी कमबॅक केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ वर्षे खेळ केल्यानंतर आज अखेर युवराजने निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना तो भावुक झाला होता. युवराज सिंगने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ४० कसोटी सामने तर ३०४ एकदिवसीय सामने खेळला आहे. पुढची एक दोन वर्षे एंजॉय करणार असून सध्या तरी कोणत्याही टीमला कोचिंग करणार नाही असंही युवीने म्हटलं आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 2:27 pm

Web Title: sachin tendulkar is my idol says yuvraj singh scj 81
Next Stories
1 आयपीएलमध्ये शेवटी खेळायला मिळालं असतं तर… युवराजची खंत
2 18 वर्षांनी वादळाची निवृत्ती; युवराज सिंगनं मानले चाहत्यांचे आभार
3 World Cup 2019: भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यासंदर्भातील हे ३२ भन्नाट मिम्स पाहिलेत का?
Just Now!
X