News Flash

स्विस बॅडमिंटन : किदम्बी श्रीकांत अंतिम फेरीत

किदम्बी श्रीकांतने भारताच्याच अजय जयरामवर मात करत स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

| March 15, 2015 05:51 am

किदम्बी श्रीकांतने भारताच्याच अजय जयरामवर मात करत स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. श्रीकांतने अजयवर १७-२१, २१-१५, २१-१८ असा विजय मिळवला. अनुभवी अजयने नेटजवळून सुरेख खेळ आणि स्मॅशेसच्या बळावर पहिला गेम जिंकला. मात्र त्यानंतर श्रीकांतने सर्वागीण खेळ करत अजयला निष्प्रभ केले. दुसऱ्या गेममध्ये १२-१२ असा सामना बरोबरीत होता. मात्र श्रीकांतने वैविध्यपूर्ण फटक्यांचा प्रभावीपणे उपयोग करत सरशी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये श्रीकांतने दमदार आघाडी घेतली होती. अजयने चिवटपणे खेळ करत ही पिछाडी भरून काढली. मात्र मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत श्रीकांतने तिसऱ्या गेमसह सामना जिंकला. अंतिम फेरीत श्रीकांतची लढत झ्यु साँग आणि व्हिक्टर अक्सलेन यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2015 5:51 am

Web Title: srikanth defeats jayaram to reach swiss open final
Next Stories
1 ठाणे, पुणे, पालघर उपांत्यपूर्व फेरीत
2 पुन्हा हॅमिल्टनराज?
3 स्पेन फिफा क्रमवारीतील अव्वल दहांमधून बाहेर
Just Now!
X