News Flash

श्रीनिवासन यांच्याभोवतीचा फास अधिक घट्ट होणार

सट्टेबाजी प्रकरणात जावई गुरुनाथ मय्यपनच्या अटकेनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. श्रीनिवासन यांचा खासगी सचिव आणि भाचा सुंदररमन याचे विंदूशी संभाषण झाल्याचे

| June 2, 2013 04:04 am

सट्टेबाजी प्रकरणात जावई गुरुनाथ मय्यपनच्या अटकेनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. श्रीनिवासन यांचा खासगी सचिव आणि भाचा सुंदररमन याचे विंदूशी संभाषण झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. अद्याप सुंदररमनचा सट्टेबाजी किंवा मॅच फिक्सिंगशी सहभाग असल्याचे सिद्ध झालेले नसले तरी त्याचा विंदूशी असलेला संपर्क संशय निर्माण करणारा आहे.
एप्रिल महिन्यात गुरुनाथ मय्यपनला आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने सावध केले होते. तरीसुद्धा मय्यपन हा बिधास्तपणे सट्टेबाजी करीतच होता. सट्टेबाजीप्रकरणी आपल्याभोवती फास आवळला जाणार नाही याची मय्यपनला खात्री होती. मुंबई पोलिसांच्या चौकशीत शनिवारी नवीन माहिती उजेडात आली. श्रीनिवासन यांचा भाचा सुंदररमन आयपीएल सामन्यादरम्यान पाच वेळा विंदूशी बोलला होता. विंदू हा सर्वाच्या संपर्कात होता. पण नेमके सामन्यादरम्यान त्याचे आणि सुंदररमनशी झालेले संभाषण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 4:04 am

Web Title: srinivasan in more problems after his pa relation with vindu open
टॅग : N Srinivasan,Srinivasan
Next Stories
1 आयपीएल प्रमुखपदाचा शुक्ला यांचा राजीनामा
2 अंकित आणि चंडिलाचे सट्टेबाजांशी आर्थिक व्यवहार असल्याची सट्टेबाज टिंकूची कबुली
3 नदाल, अझारेन्काचे संघर्षपूर्ण विजय
Just Now!
X