टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय खेळाडू आज सोमवारी हॉकी, बॉक्सिंग, नेमबाजी, टेबल टेनिस, टेनिस, तिरंदाजी, फेन्सिंग, रोईंग आणि  स्विमिंग यात आव्हान सादर केले आहे. मिराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक दिले आहे. आता चौथ्या दिवशी पदकांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये काय घडत आहे, याच्या ताज्या बातम्या येथे वाचा.

Live Blog

19:13 (IST)26 Jul 2021
महिला हॉकीत भारताचा पराभव, जर्मनीने २-० ने सामना जिंकला

महिला हॉकी स्पर्धेत जर्मनीने भारताला २-० ने पराभूत केलं.स्पर्धेतील भारताचा सलग दुसरा पराभव आहे.

18:57 (IST)26 Jul 2021
महिला हॉकी : जर्मनीकडे २-० अशी आघाडी

भारतीय संघाने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या सहा मिनिटात त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या सर्कलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जर्मनीने काऊंटर हल्ला चढवत गोलचे खाते उघडले. जर्मनीच्या नायके लोरेन्झने संघाचे खाते उघडले. एने स्क्रोडरने सामन्याच्या ३५व्या मिनिटाला गोल करत जर्मनीची आघाडी वाढवली. तत्पूर्वी, ३२व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. भारताची कर्णधार राणी रामपालने व्हिडिओ रेफरल विचारला, त्यानंतर गुरजित कौरला पेनल्टी स्ट्रोकवर गोलकरता आला नाही.

17:59 (IST)26 Jul 2021
महिला हॉकी

महिला हॉकीत भारत आणि जर्मनी आमनेसामने आले असून सामना सुरू झाला आहे.

17:04 (IST)26 Jul 2021
मिराबाईचे भारतात स्वागत

मिराबाई चानूचे मायदेशी परतल्यावर जोरदार स्वागत करण्यात आले.

17:02 (IST)26 Jul 2021
साजन प्रकाश अपयशी

जलतरण स्पर्धेत भारताच्या साजन प्रकाशने पुरुषांच्या २००मीटर बटरफ्लाय स्पर्धेत २४वे स्थान मिळविले. तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला.

15:35 (IST)26 Jul 2021
बॉक्सिंग

पुरुषांच्या मिडलवेट (६९-७५ किलो) स्पर्धेच्या राऊंड  à¤‘फ ३२च्या फेरीत आशिष कुमार चीनच्या तुओहेताकडून पराभूत झाला. टोकियो ऑलिम्पिकमधून आशीष बाहेर पडला आहे.

14:25 (IST)26 Jul 2021
मिराबाई चानूला सुवर्णपदक मिळणार?

रौप्यपदक जिंकलेल्या भारताच्या मिराबाई चानूला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. सुवर्ण पटकावलेल्या चीनच्या  हौ झीहूची उत्तेजक चाचणी होणार आहे. ती त्यात दोषी आढळली, तर मिराबाईला सुवर्णपदक मिळेल. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

14:02 (IST)26 Jul 2021
मनिका बत्रा पराभूत

मनिका बत्राच्या रूपात भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. महिला एकेरीच्या तिसर्‍या फेरीत ऑस्ट्रियाच्या १०व्या मानांकित सोफिया पोलचनोवाकडूने तिला ८-११, २-११, ५-११, ७-११ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

13:10 (IST)26 Jul 2021
टेबल टेनिस

महिला एकेरीच्या तिसर्‍या फेरीत भारताच्या मनिका बत्रासमोर ऑस्ट्रियाच्या सोफिया पोलचनोवाकडून मोठे आव्हान आहे.

12:06 (IST)26 Jul 2021
सुमित नागल बाहेर

भारताचा टेनिसपटू सुमित नागल दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा टेनिसपटू डेनिल मेदवेदेवने त्याचा २-६, १-६ असा पराभव केला. नागल बाहेर पडल्यानंतर भारताचे टेनिसमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

11:11 (IST)26 Jul 2021
नेमबाजी

मेराज अहमद खान आणि अंगद वीरसिंह बाजवा पुरुषांच्या स्कीटमध्ये पात्र ठरले नाहीत. टोक्योमध्ये नेमबाजांची खराब कामगिरी सुरूच आहे.

10:50 (IST)26 Jul 2021
टेनिस

भारताच्या सुमित नागलसमोर जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकाचा टेनिसपटू मेदवेदेवचे आव्हान आहे. सामना सुरू झाला आहे.

10:37 (IST)26 Jul 2021
तिरंदाजीत निराशा

कोरियाने भारताचे उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न भंग केले  आहे. क्वार्टर फायनलमध्ये अतानू दास, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांचा  कोरियाने सरळ सेटमध्ये ६-० असा पराभव केला.

10:35 (IST)26 Jul 2021
बॅडमिंटन

सात्विकसाई रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय जोडी ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. त्यांच्यासमोर इंडोनेशियाच्या मार्कस आणि केविन यांचे तगडे आव्हान होते.

10:31 (IST)26 Jul 2021
टेबल टेनिस

सुर्तिथा मुखर्जी टोक्यो ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे.  पोर्तुगीज खेळाडूने तिला सरळ गेममध्ये ३-११, ३-११, ५-११, ५-११ असे पराभूत केले.

10:29 (IST)26 Jul 2021
भवानी देवी ऑलिम्पिकमधून बाहेर

भवानी देवीचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या फ्रान्सच्या मॅनॉन ब्रुनेटविरोधातील सामन्यात भवानी देवीचा पराभव झाला आहे. ७-१५ ने भवानी देवीचा पराभव झाला असून ऑलिम्पिकमधील तिच्या प्रवासाला पूर्णविराम लागला आहे.

10:28 (IST)26 Jul 2021
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भवानी देवीने रचला इतिहास

तमिळनाडूच्या सीए भवानी देवीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करताना इतिहास रचला आहे. तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या एकमेव खेळाडूने एकेरी महिला गटात विजयी सुरुवात केली आहे. भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा १५-३ ने पराभव केला. भवानी देवीने फक्त सहा मिनिटे १४ सेकंदांमध्ये सामना जिंकत प्रथमच ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत यश मिळवून दिले आहे. तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू ठरली होती.

10:26 (IST)26 Jul 2021
नेमबाज आणि तिरंदाजांकडून पदकांची अपेक्षा

आज टोक्यो ऑलिम्पिकचा चौथा दिवस असून भारताला नेमबाज आणि तिरंदाजांकडून पदकांची अपेक्षा आहे.