इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने इंग्लंडच्या पुरुष टेस्ट क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी इंग्लंडचे माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम यांची नियुक्ती केली आहे. क्रिकेट बोर्डने तशी अधिकृत माहिती दिली असून मॅक्युलम लकवरच आपला कार्यभार स्वीकारणार आहे. सध्या मॅक्युलम आयपीएलमध्ये खेळत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक आहेत.

हेही वाचा >>> ‘BCCI ला भाजपा सरकार चालवतंय, खेळायचं असेल तर पाकिस्तानात या’, पीसीबीच्या माजी अध्यक्षांचं मोठं विधान

४० वर्षीय ब्रेंडन मॅक्युलम यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये प्रशिक्षण देण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे ते एकदिवसीय किंवा टी-२० क्रिकेटसाठी इंग्लंड टीमच्या प्रशिक्षकपदी नेमले जातील अशी शक्यता होती. मात्र सध्या त्यांना टेस्ट क्रिकेटसाठी इंग्लडच्या टीमला प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त करण्यात आलंय.

हेही वाचा >>> शाहरुख खानच्या नाईट रायडर्स ग्रुपचा विस्तार, यूएई टी-२० लीगसाठी खरेदी केला संघ

मॅक्युलमच्या नियुक्तीनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रतिक्रिया दिली आहे. “मॅक्यूलमला इंग्लंड पुरुष क्रिकेट कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करताना आम्हाला आनंद होत आहे. त्याची नियुक्ती इंग्लंड संघासाठी चांगली सिद्ध होईल,” असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.

हेही वाचा >>> जाडेजाने IPL सोडल्यानंतर चेन्नईच्या सीईओंनी दिली मोठी माहिती, म्हणाले “तो बाहेर पडला कारण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच मॅक्युलमनेदेखील त्याच्या नियुक्तीनंतर आनंद व्यक्त केला असून इंग्लंड संघासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक असल्याचं त्याने म्हटलंय. “बेन स्टोक्स हा प्रेरणादायी खेळाडू आहे. त्याच्यासोबत काम करुन संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे मॅक्युलम म्हणाला. तसेच मला संघापुढे कोणते आव्हान आहे याचीही मला जाणीव आहे, असेदेखील मॅक्युलम म्हणाला.