Virat Kohli practicing catching before the match against Australia in World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील टीम इंडिया आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईत खेळला जाणार आहे. त्तत्पूर्वी भारतीय संघ आपल्या सराव सत्रात व्यस्त आहे. दरम्यान सराव सत्रातील विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची जगातील सर्वात फिट खेळाडूंमध्ये गणना केली जाते. ही गणना का केली जाते, याचा एक नमुना विराट कोहलीने खुद्द सादर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत, विराट कोहली झेल घेण्यासाठी सुपरमॅनप्रमाणे हवेत झेपावल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते विराट कोहलीच्या फिटनेसचे कौतुक करत आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ लायक करुन शेअर करत आहेत.

त्तत्पूर्वी, रेव्ह स्पोर्टसच्या माहितीनुसार, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना जखमी झाला. फलंदाजीचा सराव करत असलेल्या हार्दिकच्या बोटावर वेगवान चेंडू लागला आणि त्यानंतर त्याने पुढे फलंदाजी केली नाही. मात्र, दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. खबरदारी म्हणून सराव न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकापूर्वी शुबमन गिलनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने वाढवली भारताची डोकेदुखी; सराव सत्रात बोटाला झाली दुखापत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिलबद्दल बोलायचे तर, भारताचा सलामीवीर डेंग्यूने ग्रस्त होता आणि बुधवार आणि गुरुवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताचे प्रशिक्षण सत्रात सहभागी झाला नाही. टीम मॅनेजमेंटला आशा होती की गिलचा आजार फ्लू व्यतिरिक्त काही नाही, पण क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार तसे झाले नाही. बीसीसीआयने आपल्या अधिकृत अपडेटमध्ये म्हटले आहे की. “वैद्यकीय पथक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. आम्हाला आशा आहे की तो लवकरच बरा होईल.”

विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.