अभिनव बिंद्राच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाने नेमबाजीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या पदकानेच देशभरात या खेळाच्या प्रसाराला चालना मिळाली. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर अभिनवने स्पर्धात्मक नेमबाजीतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. परंतु आपल्या अनुभवातून युवा नेमबाज घडवण्याच्या कार्यात आता अभिनवसुद्धा उतरला आहे. ‘गो स्पोर्ट्स फाऊंडेशन’च्या उपक्रमाच्या माध्यमातून अभिनव बिंद्रा नेमबाजी विकास कार्यक्रमांतर्गत देशभरातल्या ३० नेमबाजांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या तेजस कार्ले, प्राची गडकरी, तृषा मुखर्जी आणि सुमेध देवळालीवाला या चौघांचा समावेश
आहे.
बंगळुरू येथील साइ केंद्रात नेमबाजपटूंसाठी आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेत अभिनवसह त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक दिगपाल सिंग, आंतरराष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक सुमा शिरूर यांनीही युवा नेमबाजपटूंना मार्गदर्शन केले. १३ ते २१ वयोगटातील या नेमबाजपटूंना यापुढेही अभिनवकडून मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमाविषयी सुमा शिरूर म्हणाल्या, ‘‘ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला भेटता येणे, ही युवा नेमबाजांसाठी पर्वणी आहे. आम्हाला यशोशिखर गाठण्यासाठी खडतर मार्ग पार करावा लागला. आमच्या अनुभवाचा, ज्ञानाचा या मुलांना फायदा व्हावा, यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल, अशी आम्हाला आशा आहे. नेमबाजीसाठी आवश्यक शारीरिक आणि मानसिक असे सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
या उपक्रमात सहभागी झालेली महाराष्ट्राची प्राची गडकरी बालेवाडी येथे सराव करते. २०१३ मध्ये आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले होते. बिंद्रा यांच्या मार्गदर्शनामुळे खुशीत असलेली प्राची म्हणाली, ‘‘अभिनव बिंद्रा यांच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या क्षणानेच मला नेमबाजी खेळण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांच्याकडून नेमबाजीविषयी ऐकण्याचा क्षण अविस्मरणीय होता. त्यांना आम्ही प्रश्न, शंका विचारू शकलो आणि त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. त्यांच्या अनुभवाचा निश्चित फायदा होईल.’’
सुमेध देवळालीवाला हा बालेवाडीतील ‘गन फॉर ग्लोरी’ नेमबाजी केंद्राचा विद्यार्थी आहे. सुमेधच्या नावावर सात आंतरराष्ट्रीय पदके आहेत. पहिल्याच मार्गदर्शन सत्राने भारावलेला सुमेध म्हणतो, ‘‘विश्वविजेत्याला पाहण्याची खूप इच्छा होती. केवळ नेमबाजीच नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त गोष्टी कळल्या. त्यांच्या वागण्यातला साधेपणा खूपच भावला. खेळाडू म्हणून कसे वावरावे, या संदर्भात त्यांच्या सूचना उपयोगी ठरणार आहेत.’’
याचप्रमाणे तेजस कार्ले २०१२ मध्ये जर्मनीत झालेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धेत कांस्यपदकविजेत्या भारतीय संघात होता. २०११ मध्ये झालेल्या ‘गन फॉर ग्लोरी’ स्पर्धेत रौप्यपदक व नुकत्याच झालेल्या राज्य नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई त्याने केली आहे. तसेच गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या सरदार सज्जन सिंग सेठी स्मृती नेमबाजी स्पर्धेत तृषाने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. २०१२ मध्ये नानजिंग, चीन येथे झालेल्या  आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकविजेत्या संघात तिचा समावेश होता. पराग फाटक, मुंबई
अभिनव बिंद्राच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाने नेमबाजीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या पदकानेच देशभरात या खेळाच्या प्रसाराला चालना मिळाली. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर अभिनवने स्पर्धात्मक नेमबाजीतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. परंतु आपल्या अनुभवातून युवा नेमबाज घडवण्याच्या कार्यात आता अभिनवसुद्धा उतरला आहे. ‘गो स्पोर्ट्स फाऊंडेशन’च्या उपक्रमाच्या माध्यमातून अभिनव बिंद्रा नेमबाजी विकास कार्यक्रमांतर्गत देशभरातल्या ३० नेमबाजांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या तेजस कार्ले, प्राची गडकरी, तृषा मुखर्जी आणि सुमेध देवळालीवाला या चौघांचा समावेश
आहे.
बंगळुरू येथील साइ केंद्रात नेमबाजपटूंसाठी आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेत अभिनवसह त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक दिगपाल सिंग, आंतरराष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक सुमा शिरूर यांनीही युवा नेमबाजपटूंना मार्गदर्शन केले. १३ ते २१ वयोगटातील या नेमबाजपटूंना यापुढेही अभिनवकडून मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमाविषयी सुमा शिरूर म्हणाल्या, ‘‘ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला भेटता येणे, ही युवा नेमबाजांसाठी पर्वणी आहे. आम्हाला यशोशिखर गाठण्यासाठी खडतर मार्ग पार करावा लागला. आमच्या अनुभवाचा, ज्ञानाचा या मुलांना फायदा व्हावा, यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल, अशी आम्हाला आशा आहे. नेमबाजीसाठी आवश्यक शारीरिक आणि मानसिक असे सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
या उपक्रमात सहभागी झालेली महाराष्ट्राची प्राची गडकरी बालेवाडी येथे सराव करते. २०१३ मध्ये आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले होते. बिंद्रा यांच्या मार्गदर्शनामुळे खुशीत असलेली प्राची म्हणाली, ‘‘अभिनव बिंद्रा यांच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या क्षणानेच मला नेमबाजी खेळण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांच्याकडून नेमबाजीविषयी ऐकण्याचा क्षण अविस्मरणीय होता. त्यांना आम्ही प्रश्न, शंका विचारू शकलो आणि त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. त्यांच्या अनुभवाचा निश्चित फायदा होईल.’’
सुमेध देवळालीवाला हा बालेवाडीतील ‘गन फॉर ग्लोरी’ नेमबाजी केंद्राचा विद्यार्थी आहे. सुमेधच्या नावावर सात आंतरराष्ट्रीय पदके आहेत. पहिल्याच मार्गदर्शन सत्राने भारावलेला सुमेध म्हणतो, ‘‘विश्वविजेत्याला पाहण्याची खूप इच्छा होती. केवळ नेमबाजीच नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त गोष्टी कळल्या. त्यांच्या वागण्यातला साधेपणा खूपच भावला. खेळाडू म्हणून कसे वावरावे, या संदर्भात त्यांच्या सूचना उपयोगी ठरणार आहेत.’’
याचप्रमाणे तेजस कार्ले २०१२ मध्ये जर्मनीत झालेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धेत कांस्यपदकविजेत्या भारतीय संघात होता. २०११ मध्ये झालेल्या ‘गन फॉर ग्लोरी’ स्पर्धेत रौप्यपदक व नुकत्याच झालेल्या राज्य नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई त्याने केली आहे. तसेच गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या सरदार सज्जन सिंग सेठी स्मृती नेमबाजी स्पर्धेत तृषाने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. २०१२ मध्ये नानजिंग, चीन येथे झालेल्या  आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकविजेत्या संघात तिचा समावेश होता.