Axar will get a chance in T20 World Cup 2024 : अक्षर पटेलने अनेक प्रसंगी भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. सध्या सुरु असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेचाही तो भाग आहे. अक्षरने अफगाणिस्तानविरुद्ध मोहालीत झालेल्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत दोन विकेट्स घेतल्या. आता या अक्षर पटेलबाबत माजी खेळाडू सुरेश रैनाने प्रतिक्रिया दिली आहे. २०२२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी अक्षरला भारतीय संघात नक्कीच स्थान मिळेल, असा त्याला विश्वास आहे.

अक्षर पटेलचे टी-२० विश्वचषकाचे तिकीट निश्चित –

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यानंतर जिओ सिनेमावर बोलताना सुरेश रैना म्हणाला, ‘तो पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करतो. त्याचबरोबर जेव्हाही त्याला फलंदाजीची संधी मिळाली, तेव्हा त्याने उत्तम कामगिरी केली आहे. डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा याबाबत अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतो. कारण त्याने स्वत: याच लाइनमध्ये गोलंदाजी केली आहे. त्याच्या वेगात एक मिश्रण आहे. तसेच त्याने गुरबाजला ज्या प्रकारे बाद केले, त्यामुळे त्याचे विश्वचषकाचे तिकीट निश्चित झाले आहे.’

यानंतर सुरेश रैनाच्या मताशी सहमती दर्शवत प्रग्यान ओझा म्हणाला, ‘त्याला संघात ठेवण्यात येईल. जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज किंवा अष्टपैलू संघातून आत-बाहेर असतानाही चमकदार कामगिरी करतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्याला खेळ चांगला समजतो त्याचा खेळ अव्वल दर्जाचा असतो.’

हेही वाचा – WPL 2024 : महिला प्रीमियर लीगबद्दल मोठी अपडेट, ‘या’ दोन शहरांमध्ये खेळवला जाणार दुसरा हंगाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षर पटेल गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाचा अविभाज्य भाग आहे, पण दुखापतीमुळे तो संघातून आत-बाहेर होत राहिला आहे. त्यामुळे तो गेल्या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली होती. अक्षर पटेलच्या सातत्याने उत्कृष्ट कामगिरीमुळे रवींद्र जडेजाचे स्थान धोक्यात येऊ शकते. कारण दोन्ही खेळाडूंचा खेळ सारखाच आहे.