भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात ९ फेब्रुवारीपासून खेळवला जाईल. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने जिममध्ये मेहनत करण्यास सुरुवात केली आहे.

विराट कोहलीने शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत करताना दिसत होता. कोहली सध्या टीम इंडिया सर्वात फिट खेळाडू आहे. विराट कोहलीच्या या व्हिडिओवर अवघ्या दोन तासात १६ लाखाहून अधिक लाईक्स आल्या आहेत.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये अनेक वेळा शानदार फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात १६०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याची बॅट कांगारूंविरुद्ध नेहमीच खूप तळपते. अशा स्थितीत विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला शतकाचा दुष्काळ संपवू शकेल, अशी अपेक्षा करायला हवी. आतापर्यंत ३४ वर्षीय विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात ७ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. कांगारूंविरुद्ध क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या १६९ आहे.

विराट कोहली इंस्टाग्राम व्हिडिओ

कोहली सर्वोत्तम फलंदाज –

विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या जगभरात खूप आहे. त्याला मैदानावर खेळताना पाहणे त्याच्या चाहत्यांना आवडते. अलीकडेच कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही सर्वोत्तम शतक झळकावले. याआधी त्याने गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषक आणि बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही शतक झळकावले होते. कोहलीने हा फॉर्म कायम ठेवला तर तो लवकरच सचिन तेंडुलकरचा वनडेत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम मोडेल.

पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.