Ajit Agarkar On Karun Nair: वेस्टइंडिजविरूद्ध होणाऱ्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयकडून ५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतही भारतीय कसोटी संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे असणार आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली आहे. या संघात करूण नायरला स्थान देण्यात आलेलं नाह. २०१७ नंतर करूण नायरला पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यासाठी संधी देण्यात आली होती. पण या मालिकेत त्याला हवी तशी कामगिरी करता न आल्याने त्याला डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान संघाबाहेर केल्यानंतर मुख्य निवडकर्ते अजित आगरकरांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
करूण नायरला ८ वर्ष वाट पाहिल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. पण त्याला आपली छाप सोडता आली नव्हती. करूण नायरला बाहेर करण्याबाबत बोलताना अजित आगरकर म्हणाले, “आम्हाला त्याच्याकडून जास्तीची अपेक्षा होती. एका डावाच्या आधारे निर्णय घेता येत नाही. आम्हाला प्रत्येकाला १५-२० संधी द्यायला आवडलं असतं. पण या परिस्थितीत ते शक्य नाही.”
मायदेशात इंग्लंडविरूद्ध खेळताना करूण नायरने त्रिशतकी खेळी केली होती. मात्र, या खेळीनंतर त्याला पुन्हा भारतीय संघात खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार फलंदाजी केली. रणजी ट्रॉफी स्पर्धेत सातत्याने धावांचा पाऊस पाडला. आयपीएल स्पर्धेतही दमदार फलंदाजी करून त्याने ८ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं. २०२५ इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. मात्र ८ वर्षांनंतर मिळालेल्या संधीचा त्याला पुरेपूर फायदा घेता आला नाही. मालिकेतील ४ सामन्यातील ८ डावात फलंदाजी करताना त्याने अवघ्या २०५ धावा केल्या. या दरम्यान त्याला केवळ १ अर्धशतक झळकावता आलं होतं. या फ्लॉप कामगिरीमुळे त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आलं आहे.
वेस्टइंडिजविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव</p>