Akash Deep Took Ben Duckett Wicket: बर्मिंघहॅममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. पहिल्या डावात ५८७ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी ४२७ धावा करत डाव घोषित केला. यासह भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. इंग्लंडचे २ प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत.

इंग्लंडला सुरूवातीलाच २ मोठे धक्के

इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ६०८ धावा करायच्या आहेत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. मोहम्मद सिराजने जॅक क्रॉलीला बाद करत माघारी धाडलं. जॅक क्रॉलीला या डावात खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर आकाश दीपने भन्नाट वेगवान चेंडू टाकून बेन डकेटची दांडी गुल केली. बेन डकेट अवघ्या २५ धावांवर माघारी परतला.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना ५ वे षटक टाकण्यासाठी आकाश दीप गोलंदाजीला आला. इंग्लंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला होता. त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज सावध होऊन फलंदाजी करत होते. याचा आकाश दीपने चांगलाच फायदा घेतला. तर झाले असे की, आकाश दीपने डावखुऱ्या हाताच्या बेन डकेटला राऊंड द विकेटचा मारा करत ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. हा चेंडू अँगलने आत आला आणि डकेटला काही कळायच्या आत बॅटची कडा घेऊन स्टंपला जाऊन लागला. त्यामुळे डकेटला अवघ्या २५ धावांवर माघारी परतावं लागलं.

भारतीय संघाने दिलं ६०८ धावांचं आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक १६१ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजाने नाबाद ६९ धावा, ऋषभ पंतने ६५ धावांची खेळी केली. सलामीला आलेल्या केएल राहुलने चांगली सुरूवात करून देत ५५ धावांची खेळी केली. यासह भारतीय संघाने दुसरा डाव ४२७ धावांवर घोषित केला.