आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (11 जानेवारी) खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना फायदा झाला आहे. कोहलीने गुवाहाटी एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते, ज्याचा त्याला बंपर फायदा झाला आहे.

एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत विराट कोहलीला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीशिवाय टॉप-१० मध्ये भारताचा दुसरा फलंदाज रोहित शर्मा आहे, त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. रोहित आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कोहलीने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले –

भारतीय संघाचा स्टार खेळाडू कोहलीने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध गुवाहाटी वनडेमध्ये ८७ चेंडूत ११३ धावांचे शतक झळकावले. तर कर्णधार रोहित शर्माने ६७ चेंडूत ८३ धावा केल्या. गोलंदाजीत उमरान मलिकने ३ तर मोहम्मद सिराजने २ बळी घेतले. भारतीय संघाने हा सामना ६७ धावांनी जिंकला.

स्मिथ आणि बेअरस्टो यांना झाले नुकसान –

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ एका स्थानाने घसरून ७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर इंग्लिश खेळाडू जॉनी बेअरस्टो दोन स्थानांनी घसरून ९व्या क्रमांकावर आला आहे. याशिवाय टॉप-१० फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८९१ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

हेही वाचा – SAT20: मुंबई इंडियन्ससाठी गूड न्यूज; डेवाल्ड ब्रेविसची पहिल्याच सामन्यात वादळी खेळी, फटकेबाजीचा VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत सिराजला फायदा –

श्रीलंकेविरुद्ध दोन विकेट घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही एकदिवसीय क्रमवारीत फायदा झाला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराज आता ४ स्थानांनी झेप घेत १८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकले असून तो भारतीयांमध्ये नंबर-१ बनला आहे. क्रमवारीमध्ये सिराजच्या वर एकही भारतीय गोलंदाज नाही. तर बुमराह एक पायरी घसरत १९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.