Sports Minister Roshan Ranasingha has suspended Sri Lanka Cricket Board: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारताकडून श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव झाला. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट संघ कसा तरी विश्वचषकात उपांत्य फेरी गाठण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी देशाचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघा यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डालाच बरखास्त केले आहे. त्यांनी माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांना बोर्डाच्या प्रशासनाचे हंगामी अध्यक्ष बनवले आहे.

क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी माजी विश्वचषक विजेत्या कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम सात सदस्यीय समिती नेमली आहे. याशिवाय क्रीडा मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रणसिंगे यांनी १९७३ च्या क्रीडा अधिनियम क्रमांक २५ अंतर्गत समितीची नियुक्ती केली आहे. रणसिंगे यांनी नियुक्त केलेले राष्ट्रीय क्रीडा परिषदेचे प्रमुख रणतुंगा सिल्वा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सिल्वा यांची मे महिन्यात सलग तिसर्‍यांदा एसएलसी प्रमुख म्हणून निवड झाली जी २०२४ पर्यंत होती.

चाहत्यांनी केली होती निदर्शने –

संघाच्या कामगिरीवर श्रीलंकेचे चाहते प्रचंड संतापले असून यासाठी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. शनिवारी त्यांनी मंडळाच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. क्रीडामंत्र्यांनी सोमवारी उर्वरित सदस्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ केले आणि त्यांच्या जागी बोर्ड चालवण्यासाठी अंतरिम समिती नेमली. यापूर्वी, विश्वचषकात भारताविरुद्ध ३०२ धावांनी झालेल्या पराभवानंतर क्रीडामंत्र्यांनी सर्वांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

हेही वाचा – IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवल्यानंतर बीसीसीआयने कोहली-जडेजाचे केले विशेष अभिनंदन, VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर झाली वादाला सुरुवात –

२ नोव्हेंबरला विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात श्रीलंकेचा संघ अवघ्या ५५ धावांत सर्वबाद झाला होता. यानंतर संघाच्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, सामन्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षकही खेळाडूंचा बचाव करताना दिसले होते. यानंतर बोर्डाचे काम पाहण्यासाठी सात सदस्यांची अंतरिम समिती स्थापन करण्यात आली असून त्यात तीन निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश आहे. अर्जुन रणतुंगा यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. रणतुंगा यांनी १९९६ साली श्रीलंकेला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.