Team India Squad Asia Cup 2023: अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यानंतर पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी आशिया चषकाच्या सामन्यांमध्ये कोणाला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले जाऊ शकते याविषयी माहिती दिली. रोहित शर्मा हा उत्तम खेळाडू आहे त्याचे रेकॉर्ड सर्वांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे आताच्या घडीला त्याला सलामीला उतरवण्यास प्राधान्य दिले जाईल. याशिवाय आगरकर यांनी नव्या पिढीतील दोन खेळाडूंवर सुद्धा सलामीवीर म्हणून विश्वास दर्शवला आहे.

आगरकर म्हणाले की, शुबमन गिल आणि ईशान किशन यांचा मागील वर्षभरातील खेळ उत्तम ठरलेला आहे. त्यामुळे रोहितबरोबर पर्यायी या दोघांचाही सलामीवीर म्हणून विचार केला जाऊ शकतो.”

दुसरीकडे शिखर धवनची निवड न होण्यावरून आगरकर यांनी उत्तर दिले आहे, ते म्हणतात, “केवळ १५ जणांना जागा देणे शक्य असते त्यामुळे साहजिकच काहींना संधी देणे शक्य होत नाही. ” याच आशयाची प्रतिक्रिया रोहित शर्माने युझवेन्द्र चहल याच्या निवडीबाबत सुद्धा दिली आहे. “एकाच वेळी दोन रिस्ट स्पिनर्सची आवश्यकता नव्हती आणि समीकरण पाहिल्यास सध्या कुलदीप चहलच्या पुढे आहे त्यामुळे त्याला प्राधान्य देण्यात आले”. असे उत्तर रोहितने दिले आहे.

आशिया चषक २०२३ साठी कसा असेल भारतीय संघ?

Asia Cup 2023 साठी भारतीय संघ ठरला! श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, बुमराहचं पुनरागमन, ‘या’ खेळाडूंना डच्चू

दरम्यान टीम इंडियाच्या घोषणेनंतर अनेकांनी या नव्या चेहऱ्याच्या संघाचं कौतुक केलं आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंवर नजर टाकल्यास आयर्लंडमध्ये असलेल्या T20I संघात मोलाची भूमिका बजावलेल्या निवडकर्त्यांनी जसप्रीत बुमराह आणि प्रसीध कृष्णा या दोघांव्यतिरिक्त मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे बॉलिंगसाठी उत्तम पर्याय आहेत. तर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि पंड्या हे तीन अष्टपैलू खेळाडू आहेत.