BCCI Broadcasting Media Rights: रिलायन्स ग्रुपच्या वायकॉम १८ने पुढील ५ वर्षांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मीडिया अधिकार सुरक्षित केले आहेत. बीसीसीआयने सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२८ या कालावधीत नवीन चक्रासाठी मीडिया अधिकारांचा लिलाव आयोजित केला होता. क्रिकेट वेबसाइट क्रिकबझच्या अहवालानुसार, हे अधिकार मिळवण्यात वायाकॉम १८ने बाजी मारली आहे. या शर्यतीत असलेल्या डिस्ने-स्टार आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कला सर्वाधिक बोली लावून हे करार मिळवले.वायाकॉम १८ (Viacom18) पुढील पाच वर्षांसाठी भारतात खेळल्या जाणार्‍या द्विपक्षीय क्रिकेट सामन्यांसाठी BCCI मीडिया अधिकारांसाठी सर्वाधिक बोली लावणारी आहे. Viacom18 आता बीसीसीआयला प्रति सामन्यासाठी ६७.८ कोटी रुपये देईल.

जिओ सिनेमा (Jio Cinema) सर्व सामने ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीम करेल आणि Sports18 ते टेलिव्हिजनवर प्रसारित करेल. पूर्वीचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया मालिका आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ प्रसारित करेल. क्रिकबझमधील एका अहवालानुसार, Viacom18 पुढील पाच वर्षांसाठी भारताच्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय सामन्यांचे प्रसारण करण्यासाठी प्रति सामन्यासाठी डिजिटल आणि टीव्ही दोन्हीसाठी ६७.८ कोटी रुपये देईल.

हे हक्क दोन पॅकेजेसमध्ये विकले गेले, पॅकेज ए मध्ये इंडिया सबकॉन्टिनेंट टीव्हीचा समावेश होता, तर पॅकेज बी मध्ये इंडिया सबकॉन्टिनेंट डिजिटल प्लस वर्ल्ड टीव्ही आणि डिजिटल समाविष्ट होते. पॅकेज ए ची मूळ किंमत २० कोटी रुपये आणि पॅकेज बी साठी २५ कोटी रुपये ठेवण्यात आली होती, एकूण ८८ सामन्यांसाठी प्रत्येक गेमची एकत्रित आधारभूत किंमत ४५ कोटी रुपये होती.

बीसीसीआय मीडिया हक्क पॅकेज

पॅकेज ए: टेलिव्हिजन हक्क प्रति गेम २० कोटी रुपये (भारतीय उपखंड)

पॅकेज बी: प्रति गेम २५ कोटी रुपयांचे डिजिटल अधिकार (भारत आणि उर्वरित देश)

हेही वाचा: IND vs PAK, Asia Cup: भारत-पाकिस्तान आशिया कप महामुकाबल्यावर पावसाचे सावट; सामना रद्द झाल्यास काय असेल समीकरण? जाणून घ्या

२०१८ मध्ये, स्टार स्पोर्ट्स इंडियाने २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी ६१३८.१ कोटी रुपयांची बोली लावली होती, जी प्रति गेम सरासरी ६०.१ कोटी रुपये होती. त्यात सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आता झी सह एकत्रित २०२४ पासून पुढील चार वर्षांसाठी आयसीसी विश्वचषकाचे टीव्ही हक्क घेतले आहेत. बीसीसीआयला आता प्रती सामना ६७.८ कोटी असे पाच वर्षांत ५,९६६,४ कोटींची डील मिळाली आहे. २०१८-२०२३ या कालावधीत स्टार इंडियाने ६१३०.१० कोटी रुपयांत मीडिया हक्क जिंकले होते. त्यापेक्षा आताची रक्कम कमी वाटत असली तरी तेव्हा १००+ सामने होते आणि आता ८८ सामने आहेत. त्यानुसार पुढील पाच वर्ष बीसीसीआयला प्रतीसामना ६७.७ कोटी मिळतील. डिजिटल हक्क ३१०० कोटींना आणि टेलिव्हिजनचे हक्क २८६० कोटींचा विकले गेले आहेत. यामध्ये २५ कसोटी, २७ एकदिवसीय आणि ३६ टी२० सामन्यांचा समावेश आहे. प्रमुख राष्ट्रांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१, इंग्लंडविरुद्ध १८, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० आणि न्यूझीलंडविरुद्ध ११ सामने आहेत.

हेही वाचा: SL vs BAN: पाथिरानाची धारदार गोलंदाजी अन् कुशल मेंडिसचा अफलातून झेल, शाकिबही झाला चकित; पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

BCCIने २०२३-२७ सायकलसाठी IPL (इंडियन प्रीमियर लीग) चे हक्क विकून ४८,३९० कोटी रुपये कमावले होते. डिस्ने स्टारने टीव्ही हक्कांसाठी २३,५७५ कोटी रुपये आणि Viacom18ने बोर्डाला डिजिटल अधिकारांसाठी २३,७५७ कोटी रुपये दिले होते. अशा बातम्या आल्या आहेत की डिस्नेला भारतातील व्यवसाय विकायचा आहे, परंतु ते त्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही. सोनी टीव्ही आक्रमकपणे बोली लावेल अशी अपेक्षा आहे, कारण २०१७ मध्ये लॉन्च करण्यापूर्वी २००८ मध्ये आयपीएलचे हक्क विकत घेतल्यापासून त्यांनी कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही.