खरं की काय..! अनुष्का शर्मानं घेतल्या ५ विकेट; BCCIच्या ‘त्या’ ट्वीटमुळं विराट होतोय ट्रोल

अनुष्का शर्मानं अर्धा संघ गारद केल्यानंतर BCCIनं एक ट्वीट केलं.

bcci posted tweet of anushka sharma took five wickets netizens trolls virat kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

भारताचा वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या टी-२० विश्वचषकात सहभागी झाला आहे. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटही सुरू आहे, अंडर-१९ वनडे चॅलेंजर ट्रॉफीमध्ये मंगळवारी एक गमतीशीर गोष्ट घडली, ज्यामुळे सोशल मीडियावर बराच गोंधळ उडाला.

जयपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या महिला भारत-अ आणि महिला भारत-ब संघादरम्यानच्या सामन्यात कर्णधार अनुष्का शर्माने शानदार खेळी केली, त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. उत्कृष्ट फलंदाजीनंतर अनुष्का शर्मानेही उत्कृष्ट गोलंदाजी केली, अनुष्काने एकूण ५ विकेट घेतल्या.

खरे तर अनुष्का शर्मा ही इंडिया-ब संघाची कर्णधार आहे. तिने सोमवारी ७२ धावांची खेळी केली आणि सहकारी फलंदाज जी. त्रिशासोबत १८८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर बीसीसीआयने अनुष्काच्या कामगिरीबाबत ट्वीट केले. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – T20 WC: “भारतीय संघात फूट, एक गट विराटच्या…”, पाकिस्तानच्या शोएब अख्तरचं धक्कादायक वक्तव्य!

भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीचे नाव देखील अनुष्का शर्मा आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना ट्रोल करण्याची आणखी एक संधी मिळाली. त्यांनी विराट आणि अनुष्काबद्दल मीम्स बनवले. टी-२० वर्ल्डकपमध्ये विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघ स्पर्धेबाहेर होण्याची दाट शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bcci posted tweet of anushka sharma took five wickets netizens trolls virat kohli adn

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या