scorecardresearch

IPL 2023: सोळाव्या हंगामापूर्वी ‘CSK’साठी वाईट तर ‘RCB’साठी आली चांगली बातमी, घ्या जाणून

IPL 2023 Updates: आयपीएल २०२३ च्या आधी, सीएसकेसाठी एक वाईट बातमी आली आणिर आरसीबीसाठी एक चांगली बातमी आली आहे. ज्यामध्ये सीएसकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

IPL 2023 Updates good news for RCB and bad news for CSK
सीएसके आणि आरसीबी (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

IPL 2023 latest Updates: आयपीएल २०२३ ची तयारी लवकरच सुरू होणार आहे. कारण आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा सुरू होण्यासाठी एक महिना आणि काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच सीएसकेसाठी एक वाईट बातमी आली आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु म्हणजेच आरसीबीसाठी एक चांगली बातमी आली आहे.

दोन्ही संघांसाठी वाईट आणि चांगली बातमी खेळाडूंशी संबंधित आहे. कारण एका संघाचा खेळाडू जखमी झाला आहे, तर दुसऱ्या संघाच्या खेळाडूने पुनरागमन केले आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी सीएसकेसाठी एक वाईट बातमी आहे.

वास्तविक, प्रथम एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेबद्दल बोलूया, ज्यांच्यासाठी वाईट बातमी न्यूझीलंडचा अष्टपैलू काइल जेमिसनशी संबंधित आहे. जो पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या आगामी हंगामातून बाहेर जाणार आहे. गेल्या सुमारे ६-७ महिन्यांपासून, तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्याने इंग्लंडविरुद्ध एक सराव सामना खेळला होता, परंतु त्याला कसोटी सामन्यातून बाहेर पडावे लागले.

त्याचवेळी, आरसीबीसाठी आनंदाची बातमी आहे की ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीनंतर तंदुरुस्त झाला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. आयपीएलपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल आणि या स्पर्धेत आरसीबीकडून खेळताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मॅक्सवेल हा आरसीबी संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. ग्लेनचा एका मित्राच्या पार्टीदरम्यान पाय फ्रॅक्चर झाला होता.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार मायदेशी परतला, जाणून घ्या कारण

५२ दिवसांत १० संघांमध्ये ७० लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर चार प्लेऑफ सामने खेळवले जातील. अशा प्रकारे या स्पर्धेत एकूण ७४ सामने होणार आहेत. १८ डबल हेडर असतील (एका दिवसात दोन सामने). सर्व सामने देशभरातील एकूण १२ मैदानांवर खेळवले जातील. साखळी फेरीत एक संघ आपल्या घरच्या मैदानावर सात सामने आणि विरोधी संघाच्या मैदानावर सात सामने खेळेल. या स्पर्धेचा अंतिम सामना २८ मे रोजी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 11:30 IST
ताज्या बातम्या