Border Gavaskar Trophy Historic India Innings: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात अशा अनेक संस्मरणीय खेळी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. अशाच काही निवडक खेळींचा आढावा आपण घेऊया.

१९९६ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) या दोन्ही क्रिकेट बोर्डांनी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि ऑस्ट्रेलियाचे ॲलन बॉर्डर यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू केली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत आतापर्यंत एकूण ५६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये भारताचा संघ कायमच वरचढ राहिला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ सामने जिंकले आहेत, २० सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत आणि १२ सामने अनिर्णित राहिले आहेत.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ हे नाव का देण्यात आलं? सर्वाधिक मालिका कोणी जिंकल्यात? वाचा इतिहास

सचिन तेंडुलकर २४१ धावांची ऑस्ट्रेलियातील सर्वाेत्कृष्ट खेळी

२००४ साली सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने शानदार द्विशतक झळकावले होते. या डावात सचिन नाबाद राहिला. या मालिकेच्या सुरुवातीला सचिन तेंडुलकर खराब फॉर्मशी झुंजत होता. त्यामुळे त्याने सिडनी कसोटीतील या डावात ऑफसाईडला कव्हर ड्राईव्ह न खेळता ही उत्कृष्ट २४१ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वाेच्च खेळी आहे. सचिन तेंडुलकरने ३३ चौकारांच्या मदतीने आणि ५५.२७ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने ही अविस्मरणीय खेळी केली होती.

हेही वाचा – Monkeygate Controversy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील प्रसिद्ध मंकीगेट प्रकरण काय होतं? हरभजन-सायमंड्समध्ये त्यावेळी नेमका कसा झाला वाद?

व्ही व्ही एस लक्ष्मणचे मोक्याच्या क्षणी द्विशतक

टीम इंडियाचा आणखी एक विश्वासार्ह फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच उत्कृष्ट रेकॉर्ड राहिला आहे. या संघाविरुद्ध त्याने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या. कोलकात्यात खेळलेली त्याची ऐतिहासिक खेळी क्वचितच कोणी विसरू शकेल. २०००-०१ मधील दुसऱ्या कसोटीत लक्ष्मणने २००१ मध्ये कोलकाता येथे झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८१ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती. लक्ष्मणच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.

‘द वॉल’ राहुल द्रविडची ऐतिहासिक २३३ धावांची खेळी

२००३-०४ मधील अॅडलेड कसोटीत राहुल द्रविडने संकटमोचक बनत संघासाठी एक उत्कृष्ट खेळी केली होती. या कसोटीत भारतीय संघाने ४ विकेट्स गमावत ८५ धावा केल्या होत्या. तर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने ५५६ धावांची मोठी मजल मारली होती. या कसोटीत राहुल द्रविडने लक्ष्मणबरोबर भारतीय संघाचा डाव उचलून धरला होता. यादरम्यान द्रविडने ४४६ चेंडूत २३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २३३ धावा केल्या होत्या. तर लक्ष्मण १४८ धावांवर बाद झाल होता. ऑस्ट्रेलियामधील भारतीय फलंदाजाची ही दुसरी सर्वात्कृष्ट खेळी आहे.

हेही वाचा – Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद

चेतेश्वर पुजाराने संपूर्ण मालिकेत खोऱ्याने केलेल्या धावा

चेतेश्वर पुजाराने २०१८-१९ च्या कसोटी मालिकेत आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने २०१८ मध्ये खेळल्या गेलेल्या ॲडलेड कसोटी सामन्यात आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना ३१ धावांनी जिंकला. या सामन्यात चेतेश्वर पुजाराची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. चेतेश्वर पुजाराने ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १२३ धावा आणि दुसऱ्या डावात ७१ धावा केल्या होत्या.चेतेश्वर पुजाराच्या या खेळीच्या जोरावर भारताने १५ वर्षांनंतर अॅडलेड ओव्हलवर सामना जिंकला होता. पुजाराने तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात १०६ धावा, तर चौथ्या कसोटीत पुजाराने उत्कृष्ट १९३ धावांची खेळी खेळली होती.

ऋषभ पंतची गाबाची घमंड तोडणारी खेळी

ऋषभ पंतने २०२१-२२ मधील ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या गाबा कसोटीत ऐतिहासिक खेळी केली होती. पंतच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्यांदा गाबाच्या मैदानावर कसोटी सामना जिंकला होता. पंतच्या ८९ धावांच्या जोरावर भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकत कांगारू संघाला धक्का दिला. पंतची ही खेळी कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम खेळी म्हणता येईल.

अजित आगरकरच्या ६ विकेट्स

अजित आगरकर यांनी २००३-०४ च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ६ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. या अॅडलेड कसोटीत राहुल द्रविडने २३३ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. त्याच सामन्यातील दुसऱ्या डावात आगरकरने १६.२ षटकांत २ मेडन ओव्हर टाकत ४१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. अजित आगरकरांच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात १९६ धावांवर सर्वबाद केले. प्रत्युत्तरात राहन द्रविडच्या ७२ आणि वीरेंद्र सेहवागच्या ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर ६ बाद २३३ धावा करत ४ विकेट्सने सामना जिंकला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जसप्रीत बुमराहचा स्लोअर बॉल आणि शॉन मार्शची विकेट

२०१८-१९ मधील भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मेलबर्नमधील तिसऱ्या सामन्यात बुमराहने स्लोअर बॉलवर शॉन मार्शला पायचीत केलेली विकेट खूपच अविस्मरणीय ठरली. यात कर्णधार रोहित शर्माची मोठी भूमिका होती. भारताने या कसोटीत पहिल्या डावात ७ बाद ४४३ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला १५१ धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या डावात १०६ धावा करत डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात शॉन मार्श संघाचा डाव पुढे नेत होता, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चांगल्या लयीत दिसत होते, फुलटॉस, बाऊन्सर, शॉर्ट पिच कोणताच चेंडू विकेट मिळवून देत नव्हता. लंचब्रेकपूर्वी अखेरचा चेंडू बाकी होता. बुमराहच्या हातात चेंडू होता, तितक्यात रोहित शर्मा बुमराहला येऊन म्हणाला की वनडेमध्ये तो चांगला स्लोअर बॉल टाकतोस, इथेही टाक बुमराहने पण मग स्लोअर चेंडू टाकला आणि मार्शला पायचीत केलं. ही विकेट सामन्याचा रोख बदलणारी होती आणि यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला आणि भारताने १३७ धावांनी सामना जिंकला.