scorecardresearch

दक्षिण आफ्रिकेत सचिनची बॅट तळपणार!

इन-स्विंग खेळण्याची कला सचिनला फलंदाजीत मदत करेल- अझरुद्दीन इन-स्विंग चेंडू खेळण्याचे उत्कृष्ट कसब दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत फलंदाजी करण्यात सचिनला मदत करेल अशी आशा भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी व्यक्त केली आहे.

इन-स्विंग खेळण्याची कला सचिनला फलंदाजीत मदत करेल- अझरुद्दीन  
इन-स्विंग चेंडू खेळण्याचे उत्कृष्ट कसब दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत फलंदाजी करण्यात सचिनला मदत करेल अशी आशा भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी व्यक्त केली आहे. उसळी घेणाऱया स्टेडियम्सवर फलंदाजी करण्यात सचिनला मेहनत करावी लागते असे म्हटले जाते परंतु, चेंडूवर जाऊन खेळण्यात सचिनचा हातखंडा असल्यामुळे चेंडू योग्यरितीने खेळण्यासाठीचा साजेसा वेळ घेऊन सचिन उत्तम फलंदाजी करेल असेही अझरुद्दीन म्हणाले. तसेच सचिनकडील इन-स्विंग खेळण्याचे कसब भारतीय संघातील खेळाडूला दक्षिण आफ्रिकेत गवसले तर भारत आफ्रिकन स्टेडियम्सवरही उत्तम कामगिरी करेल.
सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सचिन गेल्या ३७ कसोटी सामन्यांमध्ये आठ वेळा त्रिफळाबाद आणि दहा वेळा पायचित झाला आहे.  

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Change in stance can help sachin tendulkar play pacers easily