दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज हाशिम आमलाने वन-डे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. हाशिम आमलाने वन-डे क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सर्वात जलद ८ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा आमला दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने १७६ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली आहे. या यादीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. विराटने १७५ डावांमध्ये ८ हजार धावा पूर्ण करत ही कामगिरी केली आहे

हाशिम आमलाच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २ हजार, ३ हजार, ४ हजार, ५ हजार, ६ हजार, ७ हजार आणि ८ हजार धावा करण्याचा विक्रमही जमा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात हाशिम आमलाने दक्षिण आफ्रिकेला सावध सुरुवात करुन दिली. क्विंटन डी-कॉक आणि फाफ डु प्लेसिस माघारी परतल्यानंतर आमलाने खेळपट्टीवर तग धरत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान आमलाने अर्धशतकही झळकावलं. त्याने ८३ चेंडूत ५५ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ४ चौकारांचा समावेश होता. मिचेल सँटरनरने त्याचा त्रिफळा उडवला.